Modern Agriculture : शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा

Director of Atari Institute Dr. S. K. Roy : उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीऐवजी शेतकऱ्यांनी शेतीत अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे, तरच प्रगती शक्य आहे,
Director of Atari Institute Dr. S. K. Roy
Director of Atari Institute Dr. S. K. RoyAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उत्पन्न आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीऐवजी शेतकऱ्यांनी शेतीत अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे, तरच प्रगती शक्य आहे, असे मत भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत पुण्यातील अटारी संस्थेचे संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी व्यक्त केले.

डॉ. रॉय यांनी सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. तसेच कृषी विज्ञान केंद्राने राबविलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन माहिती घेतली. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.

Director of Atari Institute Dr. S. K. Roy
Agriculture Policy : धोरण बदलांच्या प्रतीक्षेत कृषी बाजार

डॉ. रॉय म्हणाले, की शेतीची व्याख्या आता बदलते आहे, तीच ती पिके आणि उत्पादन घेऊन आता चालणार नाही, बाजाराची गरज पाहून उत्पादन घ्या, नाविन्यपूर्णता आणताना, शेतीमालाचे मार्केटिंगही करता आले पाहिजे. लागवड ते काढणी व्यवस्थापनापर्यंत आधुनिकता वाढली आहे. त्याचा वापर शेतीत वाढवावा.

Director of Atari Institute Dr. S. K. Roy
Modern Agriculture : आधुनिक शेतीचा अवलंब केल्यास शाश्‍वत रोजगार मिळेल

श्री. गायकवाड म्हणाले, की कृषी विज्ञान केंद्राचा केंद्रबिंदू कायमच शेतकरी हाच राहिलेला आहे. अटारी पुणे यांच्यासमवेत प्रभावीपणे कार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत. शेतकऱ्यांनीही केव्हीकेला यावे आणि त्यांना हवी ते मार्गदर्शन घ्यावे, आमची टीम सदैव तत्पर आहे, असे सांगितले. डॉ. तांबडे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला, तसेच नव्या उपक्रमांविषयी माहिती दिली.

या वेळी सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या निविष्ठांचे निर्मिती केंद्र व बीज प्रक्रिया युनिटचे उद्‌घाटन डॉ. रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्राच्या उत्पादन युनिटला भेट देऊन डॉ. रॉय यांनी माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बार्शीतील प्रयोगशील शेतकरी नवनाथ कसपटे, राजाभाऊ देशमुख, संतोष ठोंबरे यांच्या शेती प्रयोगांना भेट दिली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com