Development Of India : देशात होणाऱ्या शहरीकरणाला महानगरीकरण म्हणणे अधिक योग्य

आपल्या देशात पाच हजारांपेक्षा जास्त शहरे आहेत. ज्या वेळी आपण शहरीकरण म्हणतो, त्या वेळी असे वाटण्याची शक्यता आहे की सर्वच शहरे एकाच वेगाने आणि एकाच तीव्रतेने वाढत आहेत.
Development
DevelopmentAgrowon
Published on
Updated on

संजीव चांदोरकर

आपल्या देशात शहरीकरण जोरात सुरू असल्याचे सांगितले जाते; पण जे काही सुरू आहे त्याला ‘महानगरीकरण’ असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

आपल्या देशात पाच हजारांपेक्षा जास्त शहरे आहेत. ज्या वेळी आपण शहरीकरण म्हणतो, त्या वेळी असे वाटण्याची शक्यता आहे की सर्वच शहरे एकाच वेगाने आणि एकाच तीव्रतेने वाढत आहेत. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. मोठी शहरे अजूनच मोठी होत आहेत आणि छोटी शहरे अजूनही आक्रसत आहेत.

देशाच्या जीडीपीपैकी जवळपास ७० टक्के जीडीपी शहरांच्या अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देत असतात; त्यात देखील मूठभर महानगरांचा वाटा सतत वाढत आहे.

सारा खेळ देशातील अस्तित्वात असणारी महानगरे आणि पुढच्या काही दशकांत होऊ पाहणाऱ्या महानगरांचा आहे. त्यांची संख्या ५० च्या आसपास असू शकते; जास्तीत जास्त ७०.

Development
Nagar City News : नगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे ः राम शिंदे

महानगर कशाला म्हणायचे याच्या औपचारिक व्याख्या आहेत; त्या तूर्तास बाजूला ठेवूया. आणि खालील निकष लावूया

- कोणत्या शहरांची लोकसंख्या सतत वाढत आहे?

- कोणत्या शहरांचा जीडीपी सतत वाढत आहे?

- देशातील कोणत्या शहरांमध्ये रिअल इस्टेट कंपन्या गुंतवणूक करत आहेत?

- कोणत्या शहरांमध्ये देशी / परकीय कॉर्पोरेट भांडवल गुंतवणूक होत आहे?

- कोणत्या शहरांमध्ये शेअर मार्केट / म्युच्युअल फंडात / सोन्यात जास्त गुंतवणूक होते?

- कोणत्या शहंरात विविध प्रकारच्या बँका / वित्तसंस्थांची हेड क्वार्टर्स आहेत?

- कोणत्या शहरांमध्ये / फायनान्स / आयटी / नवतंत्रज्ञान स्टार्ट अप उद्योग उभे राहत आहेत?

- कोणत्या शहरांत केंद्रीय किंवा त्या त्या राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदी वाहत आहेत?

- कोणत्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेचे जाळे बांधले जात आहे किंवा इतर पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत?

- कोणती शहरे JNNURM / AMRUT/ SMART सिटी यांच्या यादींमध्ये आहेत?

- कोणती शहरे विद्यापीठे / थिंक टँक्स / धोरणकर्त्यांचे अड्डे आहेत?

- कोणत्या शहरांत सर्वात जास्त गुन्ह्यांची नोंद होत आहे?

- तुम्ही या निकषात अजून भर घालू शकता. पुन्हा पुन्हा त्याच त्याच मोठ्या शहरांची नावे येत राहतील.

Development
Agri Student Protest : मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन; कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा इशारा

हे चित्र फक्त भारतात नाही; तर जगभरात आहे. ७००-८०० कोटी लोक आणि वार्षिक १०० ट्रिलियन डॉलर्सचा कारभार जगभरातील फक्त ५०० शहरांमधून चालतो. हीच शहरे आर्थिक, व्यापारी, राजनैतिक, बँकिंग, वित्तीय, स्टॉक मार्केट, तंत्रज्ञान, मोठ्या कंपन्यांची सत्ताकेंद्रे आहेत.

ही महानगरे आहेत कल्पनातीत क्षमतेची चुंबकीय क्षेत्रे आणि आपण आहोत एखाद्या जमिनीवर पडलेले लोखंड / पोलादाचे कण!

(लेखक प्रख्यात अर्थविश्‍लेषक असून, टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com