Budget Session 2024 : 'केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांची स्थिती मजबूत; वीज आणि रस्तेही पोहोचले' : राष्ट्रपती मुर्मू

Budget Session 2024 Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी, गेली काही वर्षापासून देशासाठी इतिहास घडवत आहेत. आज संपूर्ण जग भारताच्या विकसनशील व्यवस्थेचे यश स्वीकारत आहे. भारताचा विकास दर सलग दोन तिमाहीत सात टक्क्यांहून अधिक राहिल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे.
Budget Session 2024
Budget Session 2024Agrowon

Pune News : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज बुधवारपासून (३१ रोजी) सुरूवात झाली आहे. यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी, भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकसित होत आहे. केंद्र सरकार महिला शक्तीपासून तरुणांना नवी ओळख देण्यापर्यंत अनेक क्षेत्रात काम करत आहे. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व पक्षांचे खासदार उपस्थित होते.

शेतकऱ्यांना अधिक महत्त्व

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, त्यांच्या सरकारने शेतीचा खर्च कमी करून नफा वाढवण्याचे काम केले आहे. देशातील शेतकऱ्यांना अधिक महत्व देताना, कृषी योजना आखली असून त्यात १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना सामावून घेतले आहे.

Budget Session 2024
Budget 2024 Live : 'युवा, महिला, शेतकरी आणि गरीब वर्ग विकसित भारताच्या भव्य इमारतीचे चार खांब' : राष्ट्रपती मुर्मू

तसेच पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात आले आहेत. बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुलभ कर्जात दोन वर्षांत तीन पटीने वाढ झाली आहे. गेल्या १० वर्षात भात आणि गहू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना MSP म्हणून अंदाजे १८ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्तात खते मिळावीत यासाठी १० वर्षांत ११ लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. नमो ड्रोन योजनेंतर्गत बचत गटांना १५ हजारांत ड्रोन दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या.

आदिवासी गावांमध्ये वीज, पाणी आणि रस्ते

यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी, केंद्रातील मोदी सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ या संकल्पनेमुळे देशातील मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा झाल्याचे म्हटलं आहे. तसेच मुर्मू म्हणाल्या की, केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारमुळे हजारो आदिवासी गावांमध्ये वीज आणि रस्ते पोहोचले आहेत. आजपर्यंत या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना वीज मिळाल्याने काय फायदा होऊ शकतो हेही माहीत नव्हते.

Budget Session 2024
Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस शक्य

तसेच पाइपलाइनद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्यासह आदिवासी बहुल गावांमध्ये 4G नेट सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच सर्वाधिक मागासलेल्या गटासाठी २६००० कोटी रुपयांची पंतप्रधान जनमान योजना करण्यात आली आहे. तृथीयपंथीयांसाठी देखील कायदा करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

गरिबांच्या रेशनवर २० लाख कोटी रुपये खर्च

दरम्यान आपल्या अभिभाषणात राष्ट्रपती मुर्मू यांनी केंद्राने गरिबांच्या रेशनसाठी २० लाख कोटी रुपये खर्च केलेत. यामुळे गरीब कुटुंबांचे जीवन सुसह्य झाले आहे. तर कोरोनाच्या काळापासून देशातील करोडो लोकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे असून ही योजना पुढील पाच वर्षांसाठीही वाढवण्यात आल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

वन नेशन वन पॉवर ग्रीड

यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, वन नेशन वन पॉवर ग्रीडद्वारे वीज पुरवठ्यात आणखी सुधारणा झाली आहे. विजेच्या उपलब्धतेमुळे विकासालाही गती मिळाली आहे. तर या जोनेमुळे वीज म्हणजे काय असते हे माहित नसणाऱ्या हजारो आदिवासी गावांमध्ये वीज पोहचली आहे.

Budget Session 2024
Budget 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात, 'हा क्षण स्त्री शक्तीच्या पर्वाची सुरुवात असेल'

निर्यात वाढली, पक्की घरेही मिळाली

केंद्र सरकारच्या मेड इन इंडिया उपक्रमामुळे आज आपला देश येथून अधिक निर्यात करत असल्याचे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. तसेच केंद्र सरकारच्या धोरणामुळे ४.१० कोटी गरीब कुटुंबांना त्यांची कायमस्वरूपी घरे मिळाली असून येत्या काळात आणखी गरीबांना कायमस्वरूपी घरे मिळतील असेही त्या म्हणाल्या.

लाखो तरुणांना नोकऱ्या

तसेच केंद्र सरकारने फक्त १२ महिन्यांत लाखो तरुणांना नोकऱ्या दिल्या. केवळ नोकऱ्याच दिल्या नाहीत तर नारी शक्ती वंदन कायदाही केला आहे.

आयुष्मान भारत योजना आणि आरोग्य अभियान

आयुष्मान भारत योजनेंतर्गत गरिबांच्या मदतीसाठी केंद्र सरकार पुढे आले आहे. या योजनेंतर्गत आता मोठ्या हॉस्पिटलमध्येही उपचार करता येणार आहेत. तर केंद्र सरकारने आरोग्य अभियानांतर्गत अलीकडच्या काळात देशात ११ कोटी शौचालये बांधली आहेत. यामुळे अनेक आजारांना आळा बसला आहे.

आखली कोण कोणते मुद्द्यांवर बोलल्या मुर्मू

उज्ज्वला योजनेवर २.५ लाख कोटी रुपये खर्च

गरिबांना स्वस्त रेशन देण्यासाठी २० लाख कोटी रुपये खर्च

आयुष्मान योजनेंतर्गत मोफत उपचार

पहिल्यांदाच नळपाणी योजनेत ११ कोटी घरे जोडण्यात आली आहेत.

किडनीच्या रुग्णांना डायलिसिसची सुविधा उपलब्ध

एलईडी बल्बचा वापर करून वीज बिल वाचवण्याचा प्रयत्न

गेल्या वर्षी दोन मोठी युद्धे सुरू असतानाही देशात महागाई नियंत्रणात ठेवली

गरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वस्तात विमान तिकीट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com