Sina-Madha Scheme : सीना-माढा उपसा योजनेचा तृतीय ‘सुप्रमा’ सादर करावा

Irrigation Update : सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे.
Sina-Madha Upsa Scheme
Sina-Madha Upsa SchemeAgrowon

Solapur News : ‘‘माढा तालुक्यातील बावी, तुळशी, परितेवाडी, कुर्डू, पिंपळखुंटे, अंबाड, अंजनगाव (खे) या कायम दुष्काळी गावांना सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. तृतीय ‘सुप्रमा’ सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत,’’ अशी माहिती आमदार बबन शिंदे यांनी दिली.

Sina-Madha Upsa Scheme
Godavari Irrigation Scheme : किमान शंभर कोटींचे पॅकेज द्या

आमदार शिंदे व आमदार संजय शिंदे यांनी सीना माढा उपसा जलसिंचन योजनेसंदर्भात बैठक घेण्याची मागणी मागील आठवड्यामध्ये केली होती. त्यानुसार मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाळ देवरा, अप्पर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, लाभक्षेत्र विकासचे सचिव डॉ. संजय वेळसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोळे, मुख्य अभियंता हणुमंत धुमाळ, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Sina-Madha Upsa Scheme
Purandar Irrigation Scheme : ‘पुरंदर उपसा’ होणार गतिमान

बबन शिंदे म्हणाले, ‘‘२८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयामुळे माढा तालुक्यातील बावी, तुळशी, पिंपळखुंटे, अंबाड, परितेवाडी, कुर्डू, अंजनगाव (खे) गावांचा या योजनेंतर्गत समावेश आहे. माढा तालुक्यातील सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीव्दारे बचत झालेल्या पाण्यातून या गावांना पाणी देण्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून २६ जून २०२४ रोजीच्या बैठकीत मंजुरी मिळाली.

या गावांतील विकेंद्रित जलसाठे भरण्यासाठी तृतीय ‘सुप्रमा’ तयार केल्यानंतर निधी उपलब्ध होईल. माढा तालुक्यातील खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेस शासनाकडून तत्त्वतः: अंतिम मान्यता मिळाली. मानेगाव, धानोरे, बुद्रुकवाडी, कापसेवाडी, हटकरवाडी, पाचफुलवाडी या कायम दुष्काळी गावांना पाणी मिळेल. त्यामुळे सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com