Shivsena Thackeray Gat : ठाकरे गट लढवणार बाजार समिती निवडणूक

कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट पूर्ण क्षमतेने लढवणार आहे.
Thackeray Gat
Thackeray GatAgrowon
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Agriculture Produce Market Committee) सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट पूर्ण क्षमतेने लढवणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये राहून या निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.

कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांची बैठक झाली. त्या वेळी देवणे बोलत होते.

Thackeray Gat
Nanded APMC Election : बाजार समिती निवडणुकीत दिग्गज उतरणार रिंगणात

यावेळी ते म्हणाले, की जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाविकास गाघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. यात सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत निर्णय झाला.

त्यानुसार बाजार समितीसह पुढील काळात सहकारात होणाऱ्या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार आहेत.

आघाडीच्या माध्यमातून सहकारच्या सत्तेपासून भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. शहरप्रमुख सुनील मोदी, प्रकाश पाटील सुरेश चौगले, राजू यादव, तानाजी आंग्रे, विनोद खोत, अनिल देसाई, डॉ. अनिल पाटील, राकेश चौगले उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.