Sanjay Malhotra : संजय मल्होत्रा ​​आरबीआयचे नवे गव्हर्नर

Sanjay Malhotra to be new Reserve Bank of India Governor : आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे.
Sanjay Malhotra
Sanjay MalhotraAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय महसूल विभागाचे सचिव संजय मल्होत्रा ​​यांची रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ उद्या (ता. १०) संपणार असून संजय मल्होत्रा बुधवारी (ता.११) पदभार स्वीकारतील. संजय मल्होत्रा पुढील तीन वर्षांसाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहतील. ते १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

संजय मल्होत्रा यांच्या नावाची घोषणा मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने केली आहे. विद्यमान गव्हर्नर म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केलेल्या शक्तीकांत दास यांच्यानंतर संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे.

Sanjay Malhotra
Reserve Bank of India : ऑनलाईन घोटाळ्यांवर आरबीआयचा निर्णय!; ‘डिजिटा’ स्थापणार

संजय मल्होत्रा ​​राजस्थान केडरचे १९९० च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे अध्यक्ष झाले. याआधी ते ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते.

Sanjay Malhotra
Reserve Bank Report : ‘एमएसपी’मुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५० टक्के परतावा निश्‍चित

संजय मल्होत्रा ​​यांचे शिक्षण

संजय मल्होत्रा ​​यांनी आयआयटी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तसेच यूएसएच्या प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण या विषयात ते पदव्युत्तर पदवी प्राप्त आहेत.

संजय मल्होत्रा यांचा अनुभव

संजय मल्होत्रा यांचा राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. तर ते गेल्या ३० वर्षांपासून ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि खाण या खात्यांमध्ये काम करत आहेत.

रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर

शक्तीकांत दास यांचा कार्यकाल २०२७ पर्यंत असणार असून ते रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर म्हणून काम पाहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com