Desi Mango : गावरान आंब्याची गोडी वाढणार

Mango Update : यंदा पनवेल तालुक्यात गावरान आंब्याची झाडे चांगलीच मोहोरली असून, त्‍याचा सुगंध शेतशिवारात दरवळत आहे.
Mango
Mango Agrowon
Published on
Updated on

Panvel News : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडतो. यंदा पनवेल तालुक्यात गावरान आंब्याची झाडे चांगलीच मोहोरली असून, त्‍याचा सुगंध शेतशिवारात दरवळत आहे. त्‍यामुळे यंदा खवय्यांना गावरान आंबा जास्त चाखायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पनवेलमधील धरणांमुळे या भागातील नद्या उन्‍हाळ्यातही प्रवाहित असतात. तसेच मोर्बे धरणातून पाटावाटे पाणी सोडले जाते. वेळोवेळी धरणातून शेती सिंचनाला पाणी मिळत असल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. या भागात अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक आंब्यांच्‍या झाडांची लागवड केली आहे.

Mango
Mango Orchard : आंबा बागायतदारांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे

त्‍यामुळे यंदा गावरान आंबा मोठ्या प्रमाणात खवय्यांना चाखायला मिळणार आहे. तसेच आधुनिक पद्धतीने आता शेतात नवनवीन जातीच्या आंब्यांची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे काहींना नवीन बाजारपेठदेखील मिळत आहे. गतवर्षी आंब्यासाठी चांगले वातावरण नसल्याने ग्राहकांपर्यंत आंबा फारसा पोहोचू शकला नाही, तर सर्वसामान्य नागरिकांच्‍या खिशाला तो आंबा परवडणारा नव्हता.

मात्र, यावर्षी गावरान आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात येण्याचे संकेत मिळत असल्याने सर्वांनाच दर परवडतील, असे आंबा बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. यावर्षी वातावरणातील बदल चांगला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंब्याचे पीक येऊ शकते, असे शेतकीतज्‍ज्ञांचे मत आहे.

Mango
Mango Blossom : बोर्डीमध्ये प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर लांबणीवर

ढगाळ वातावरणाची भीती

यंदा आंब्याला चांगला मोहोर लागल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे; परंतु दोन- चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. असेच वातावरण काही दिवस राहिल्यास शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची भीती आहे.

लागवड केलेल्या नवनवीन जातीच्या आंब्यासोबतच यंदा गावरान आंब्यांनादेखील मोठ्या प्रमाणात मोहर आला आहे. मागील वर्षी आंब्याला मोहर आला होता; परंतु ढगाळ वातावरणामुळे मोहर गळून गेला. यावर्षी मोहराचे प्रमाण जास्त असल्याने आंब्याचे प्रमाण वाढणार आहे.
सुधाकर पाटील, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com