Maharashtra Politics : आचारसंहिता काहीच तासांवर; त्याआधीच राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा पार पडला शपथविधी

Maharashtra MLC : राज्यातील सर्वच घटकांचे लक्ष आता आचारसंहिता कधी लागू होते याकडे लागले आहे. यादरम्यान मंगळवारी (ता.१५) निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. यावेळी झारखंड आणि राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यासह झारखंड विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाला महाराष्ट्रासह झारखंडमधील विधानसभा निवडणुकींच्या कार्यक्रम जाहीर करावा लागेल. यासाठी मंगळवारी (ता.१५) आयोगानाकडून दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून काहीच तासांनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा शपथविधी पार पडला.

यावेळी भाजपकडून चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबू सिंग राठोड यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी तर मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांनी शिवसेनेकडून आमदारकीची शपथ घेतली. या आमदारांना शपथ मंगळवारी दुपारी १२.३० वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : महायुतीशी संबंधित पाच सहकारी साखर कारखान्यांना ८१५ कोटी रुपयांच्या कर्जाची शिफारस

राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असून महायुती, महाविकास आघाडी आणि इतर घटक पक्षांमध्ये जागा वाटपाची चर्चा अखेरच्या टप्प्यात आली आहे. याचदरम्यान आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी साडेतीन वाजता आहे. त्यामुळे आता लवकरच विधानसभेची निवडणुकीची घोषणा होईल, असे बोलले जात आहे.

ठाकरे गट हायकोर्टात

दरम्यान या आमदारांच्या शपथविधीला विरोध करणारी याचिका शिवसेना ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. तसेच आधीचे प्रकरण प्रलंबित असताना सात आमदारांची नियुक्ती करणे असंविधानिक असल्याचेही ठाकरे गटाने आपल्या याचिकेत म्हटले होते. पण यावर आजच्या सुनावणीत निकाल राखून ठेवताना नियुक्त्यांना कोणतीही स्थगिती नव्हती, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यानी दिलं केला होता. यानंतर राजभवनातील सोहळ्याला कोणतीही स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com