Namo Scheme’s 6th Installment: ‘नमो’चा सहावा हप्ता दोन दिवसांत खात्यात!

Farmer Benefits: राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महामानधन योजने’अंतर्गत सहावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, त्याचा फायदा लवकरच दिसून येईल.
Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme
Namo Shetkari Mahasanman Nidhi SchemeAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सहावा हप्ता दोन दिवसांत मिळणार आहे. त्यासाठी दोन हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme
Namo Installment : नमोचा हप्ता शनिवारीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार; कृषी विभागाची माहिती

शेतकऱ्यांना अलीकडेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या टप्प्याचा १९ वा हप्ता मिळाला होता. परंतु याच योजनेतील पात्र शेतकऱ्यांना राज्याकडून ‘नमो’चा हप्ता दिला जातो. त्यानुसार पाच हप्ते मिळाले होते; परंतु सहावा अद्याप मिळालेला नव्हता.

‘‘राज्यातील ९३ लाख २६ हजार शेतकऱ्यांना ‘नमो’चा सहावा हप्ता वाटण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. राज्याच्या तिजोरीतून दोन हजार १६९ कोटी रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा होतील. बहुतेक ठिकाणी ३१ मार्चअखेर शेतकऱ्यांना पैसे प्राप्त झालेले असतील,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme
Namo Nidhi 6th Installment : अखेर 'नमो शेतकरी महासन्मान'च्या सहाव्या हप्त्यासाठी १ हजार ६४२ कोटी रुपये निधीला मान्यता

राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबाला (पती, पत्नी व त्याची १८ वर्षांखालील अपत्ये) यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याची तरतूद ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’त आहे. प्रतिहप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात ही रक्कम देण्याचे राज्याने घोषित केले होते.

‘पीएम किसान’मधून मिळणाऱ्या सहा हजारांच्या मदतीत भर घालणारी ही योजना राज्याने चालू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन्ही योजना मिळून वार्षिक बारा हजार रुपये मदत जमा होत आहे. ‘नमो’ योजनेतून आतापर्यंत ९० लाख ८६ हजार शेतकऱ्यांना राज्याने आठ हजार ९६१ कोटी रुपये वाटले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com