Team Agrowon
महानंद आहे राज्य सहकारी दूध संघ. म्हणजे काय तर सदस्य सहकारी दूध संघांनी महानंदला दूध घालणं अपेक्षित होतं.
त्यासाठी सुरुवातीला ५ टक्के दूध घालणे बंधनकारक होते. नंतर ३ टक्के आणि शेवटी २ टक्क्यांवर गाडी घसरली.
पण या सदस्य दूध संघांनी महानंदला दूध न घालता स्वत:चे ब्रॅंड तयार केले. आता हे ब्रॅंड तयार करण्याला काही विरोध नव्हता.
पण सदस्य सहकारी दूध संघांनी आपल्या जिल्हयाच्या बाहेर दूध विक्री करताना 'महानंद'च्या नावाखाली विक्री करणं अपेक्षित होतं.
पण त्याला फाटा देत स्वत:चे उखळ पांढरे करून या सदस्यांनी आपलेच ब्रॅंड मोठे केले.
त्यामुळे झालं काय तर ९ लाख ५० हजार दुधावर प्रक्रिया क्षमता असणाऱ्या महानंदला एक ते दीड लाख दूध मिळू लागलं. वापराविना दूध संघांचे यंत्र गंज धरू लागले.