Electricity Bill : राज्यातील शेतकऱ्यांना वीज दरवाढीचा ‘शॉक’

Electricity Bill hike : एक एप्रिलपासून लागू; १२ टक्केपर्यंत वाढ
Electricity Bill
Electricity BillAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. कृषीसह सर्वच घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने जोरदार ‘शॉक’ दिला आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे. या वीज दरवाढीमुळे वीज दरात ६ ते १२ टक्के वाढ होणार असून, स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाही ग्राहकांवर पडणार आहे. हा आकार सर्व प्रकारच्या दरवाढीवर कमाल दहा टक्केपर्यंत आहे.

आयोगाने मागील वर्षी ‘महावितरण’च्या वीज दरवाढीला मंजुरी दिली होती. ही दरवाढ आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षाकरिता आहे. त्यामुळे मागील वर्षी १ एप्रिल २०२३ या आर्थिक वर्षात जवळपास ३ टक्के वीज दरवाढ करण्यात आली. आता २०२४ या आर्थिक वर्षापासून ही दरवाढ ६ टक्के लागू करण्यात आली.

...असे कृषिपंपांसाठीचे दर
लघु दाब शेती पंपासाठी २०२२-२३ ला ३.३० रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ ला हा दर ४.५६ रुपये प्रतियुनिट झाला आहे. उच्च दाब शेती पंपासाठी ४.२४ रुपये प्रतियुनिट दर होता. २०२४-२५ साठी तो ६.३८ रुपये झाला आहे.

Electricity Bill
Electricity Bill : नळपाणी पुरवठा योजनांना वीजबिलाचा शॉक

स्थिर आकारही वाढले
विजेचा स्थिर आकार २०२२-२३ ला लघुदाब शेती पंपासाठी ४३ रुपये प्रति अश्व शक्ती इतका होता. २०२४-२५ मध्ये ही दरवाढ ५२ रुपये प्रति अश्वशक्ती इतकी केली आहे. उच्च दाब शेती पंपासाठी ८० रुपये प्रति केव्हीए इतका स्थिर आकार होता. २०२४-२५ मध्ये ९७ रुपये प्रति केव्हीए इतकी दरवाढ झाली आहे. लघुदाब शेती पंपासाठी ही एकत्रित दरवाढ २० टक्के तर उच्च दाबासाठी २१ टक्के वाढ झाली आहे.

घरगुती ग्राहक...सध्याचे दर (प्रतियुनिट) (२०२३-२४)-नवीन दर (प्रतियुनिट) (२०२४-२५)
० ते १०० युनिट -५.५८- ५.८८
१०१ ते ३०० युनिट-१०.८१-११.४६
३०१ ते ५०० युनिट-१४.७८-१५.७२

ज्या कंपनीला २०२२ ला ग्राहकांनी ९० हजार कोटी रुपये बिलापोटी मोजले होते. हीच रक्कम गेल्यावर्षी या कंपनीने ग्राहकाकडून एक लाख सात हजार कोटी रुपये वसूल केली. यावर्षी ही वसुली एक लाख पंधरा हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल. दरवाढीचा वेग अवाढव्य आहे. याला कारणीभूत ‘महावितरण’ची अकार्यक्षमता, वीज गळती आणि सरकारी वृत्ती आहे. कंपनी ठरवते आणि त्याला आयोग आणि सरकार मान्यता देतात, हे चित्र आहे. आशा धोरणामुळे सर्वसामान्य ग्राहकांबरोबर शेतकरीही देशोधडीला लागणार आहे.
- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com