Onion Export Ban : कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावरून सत्ताधारी विरोधकांत जुंपली कोण काय म्हणाले?

Onion Rate : एखाद्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरवायचं आणि त्याच्या पायात बेड्या टाकायच्या असा उपक्रम सरकारने केलेला असल्याची टीका होत आहे.
Onion Export Ban
Onion Export Banagrowon

Maharashtra Onion : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवत भारतातील कांदा आता जगभरात कुठेही ५५० डॉलर प्रति मेट्रिक टन या किमान निर्यात शुल्क दराने विक्री करण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना पुन्हा दणका बसण्याची शक्यता आहे. यावरून राज्यातील नेत्यांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याची टीका शेतकरी संघटनांसह विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनीही यावर उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच कांदा निर्यात बंदीचा मुद्दा जोरदार तापत असल्याने सरकारने निर्यात बंदी उठवली. परंतु याला नियम अटींचे जाळे लावल्याने शेतकऱ्यांचा कांदा पुन्हा जाळीतच राहणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. यावर राज्यातील शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जोरदार टीका केली आहे.

धावणाऱ्याच्या पायात बेड्या

सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून जो कांगावा केला ही शुद्ध धुळफेक आहे. काय कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली परंतु निर्यात शुल्क वाढवल्यामुळे व्यापारी आता कांदा निर्यात करायला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जास्त दराने व्यापारी आता कांदा घेणार नाही म्हणजे एखाद्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरवायचं आणि त्याच्या पायात बेड्या टाकायच्या असा उपक्रम सरकारने केलेला असल्याची टीका होत आहे.

एका हाताने द्यायच दुसऱ्या हाताने काढायचं

दुर्दैवानं खरंतर कांदा निर्यात बंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचचं नाही हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण उघड झाले आहे. कांद्याची निर्यात बंदी उठवली म्हणून सांगायची आणि ४०% निर्यात शुल्क पुन्हा लादायची त्यामुळे या हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते असल्याची टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी केली.

Onion Export Ban
Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार?

कांद्याला चांगला भाव मिळेल - भारती पवार

कांद्याची निर्यात बंदी खुली करण्याची मागणी आम्ही केली होती यावर निर्यात बंदी सरकारने केली आहे यामुळे कांद्याला चांगला भाव मिळणार आहे. नोटिफिकेशनमध्ये स्पष्टता आहे की, किमान निर्यात मूल्य ५५० प्रति मेट्रिक टन असेल. त्यामुळे आता कोणीही मनात संभ्रम बाळगू नये, निर्यात पूर्ण खुली झाली आहे. आवक वाढली की असे निर्णय घेतले जातात. आताही आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता MEP लावल्याने शेतकर्‍यांना दर मिळेल, शेतकर्‍यांकडून चांगल्या दराने माल घेतला जाईल.

विरोधकांना फडणविसांचे उत्तर

कांद्यावरून विनाकारण महाराष्ट्रात राजकारण पेटवल जात आहे. मात्र, दुसरीकडे या निर्णयानंतर आज पहिल्याच दिवशी अनेक बाजारसमितीमध्ये कांद्याच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं असून शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच समाधानकारक बाब आहे.

विरोधकांनी नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय मात्र आमच्या सरकारने नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित बघितले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी काळात शेतकऱ्यांवर अच्छे दिन येवोत आणि नेतेमंडळीच्या या राजकारणात जगाचा पोशिंदा मात्र भरडला जाऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com