Loksabha Election : निवडणुकीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी

Shrikant Deshpande : निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भयपणे होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी (ता. २९) केले.
Election
ElectionAgrowon

Solapur News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी, ही निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भयपणे होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी (ता. २९) केले.

नियोजन भवन येथे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर आदी यावेळी उपस्थित होते.

Election
Loksabha Election : धुळे लोकसभेतील चुरस अधिक वाढणार

श्री देशपांडे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहायक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी पोलिस अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे गांभीर्यपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

Election
Co-operative Election : लोकसभेमुळे सहकारातील निवडणुकांचा खोळंबा

स्ट्रॉंग रूमसह ईव्हीएम मशीन बाबत अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. इतर जिल्ह्यातून दारू, पैसा व अन्य संबंधित बाबी आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट तयार करावेत. तसेच आंतर राज्य सीमेवर ही चेक पोस्ट तयार करावेत.

३६ लाख मतदारसंख्या

सोलापूर जिल्ह्यात २७ फेब्रुवारी २०२४ अखेर मतदार संख्या ३६ लाख ७ हजार ५३१ इतकी असून, त्यातील पुरुष मतदार १८ लाख ६७ हजार १३८ तर महिला मतदार १७ लाख ४० हजार १०९ इतके आहेत. तृतीयपंथी मतदार संख्या २८४, परदेशात गेलेले मतदार ५४, दिव्यांग मतदार २७ हजार ०४ व ८० वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार १ लाख ६ हजार १३९ तर १०० वय वर्ष पेक्षा अधिकचे मतदार ३ हजार २३, सर्विस मतदार ४ हजार ६१६ इतके आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com