Corruption News : दोषी अधिकाऱ्यांकडेच चौकशीची जबाबदारी

Corruption Update : महसूल नोंदी प्रलंबित ठेऊन मंडल अधिकारी व तलाठी लाखो रुपयांची लाच वसूल करतात, हे सिद्ध होऊनही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस कारवाई झाली नाही.
Corruption
CorruptionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : महसूल नोंदी प्रलंबित ठेऊन मंडल अधिकारी व तलाठी लाखो रुपयांची लाच वसूल करतात, हे सिद्ध होऊनही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ठोस कारवाई झाली नाही. ज्या उत्तर तहसील कार्यालयाबाबत सर्वात जास्त नोंदी प्रलंबित ठेवण्याचा प्रकार घडत आहे. त्याच तहसीलदारांकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे. यामुळे नोंदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला जिल्हाधिकारी कार्यालयातूनच आशीर्वाद मिळत आहे.

चालू महिन्यात उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी व तलाठ्याला तब्बल सहा लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. संगणकीकृत उतारा बंद झाला तो सुरू करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने लाचलुचपत खात्याकडे तक्रार करण्याचे धारिष्ट दाखवल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

Corruption
Agriculture Scheme Corruption : कापूस, सोयाबीन योजनेत १४१ कोटींचा भ्रष्टाचार

सोलापूर शहरात कार्यरत एका राजपात्रित अधिकाऱ्याच्या घरावरील कर्जाचा बोजा करण्यासाठी त्यांना गेल्या दोन वर्षांपासून उत्तर तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. याबाबत त्यांनी मंडल अधिकारी व तलाठ्याची तक्रार तहसीलदार कार्यालयात केली होती. यानंतरही या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे हताश झालेल्या अधिकाऱ्याने गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात एक तक्रारी अर्ज दाखल केला.

सदर अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारी अर्जाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई न करता हा अर्ज चौकशीसाठी डिसेंबर २३ मध्ये परत उत्तर तहसील कार्यालयाकडे पाठवला आहे. म्हणजे चोराच्या चोरीच्या चौकशीची जबाबदारी चोराकडेच असा प्रकार घडला आहे.

Corruption
Road Work Corruption : चिखलीतील पाणंद रस्त्यांच्या कामांत भ्रष्टाचार

सर्वात जास्त प्रलंबित नोंदीची संख्या ही उत्तर तहसील कार्यालयात आहेत. गेल्या महिन्यातील उत्तरमधील तब्बल सहा लाख रुपयांच्या लाचखोरीच्या घटनेमुळे हा दावा खरा ठरत आहे. या प्रकरणात जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ही नागरिकांची लूट सुरू राहणार असे दिसत आहे. या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशीच सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील सर्वच मंडलाधिकारी व तलाठ्यांचे दप्तर तपासण्याची मोहीम सुरू आहे. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. उत्तर तहसील कार्यालयाकडे प्रलंबित नोंदीबाबत केलेली विचारणा चुकीची असून, यासंदर्भात कारवाईचे आदेश देण्यात येतील.
मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com