MPKV Controversy: बनावट कागदपत्रांची तक्रार करणाऱ्या प्राध्यापकाचीच चौकशी

Fake Documents Isssue: कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन संचालकपद मिळवणाऱ्या डॉ. विठ्ठल शिर्के यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या प्राध्यापकाचीच आता चौकशी चालू करण्यात आली आहे.
MPKV
MPKVAgrowon
Published on
Updated on

Pune News: कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन संचालकपद मिळवणाऱ्या डॉ. विठ्ठल शिर्के यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या प्राध्यापकाचीच आता चौकशी चालू करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख डॉ. शिर्के हेच आहेत.

‘डॉ. शिर्के यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे संशोधन संचालकपद मिळवले आहे. त्यांनी जन्मतारखेचा खोटा दाखल देऊन शासनाची फसवणूक केली. या प्रकरणाची चौकशी करून त्यांना तत्काळ पदमुक्त करावे,’ अशी लेखी मागणी प्रा. डॉ. दिनकर केशव कांबळे यांनी २७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि विद्यापीठाचे कुलसचिव कार्यालय यांच्याकडे केली होती.

तसेच त्यांनी या प्रकरणी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, डॉ. कांबळे यांच्या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीत कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शंकर बोडके यांचा समावेश करण्यात आला. परंतु डॉ. बोडके व डॉ. शिर्के यांच्यात मैत्रीचे संबंध असल्यामुळे ही चौकशी निष्पक्ष कशी होणार, असा आक्षेप घेण्यात येत आहे.

MPKV
Agriculture Department: अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे आरोपी सुटतात निर्दोष

डॉ. शिर्के यांना आपल्याविषयी आधीपासूनच आकस असल्याचा आरोप डॉ. कांबळे यांनी केला आहे. डॉ. शिर्के यांच्याकडे कुलसचिवपदाची जबाबदारी असताना डॉ. कांबळे यांची संचालक पदी निवड करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्या वेळी डॉ. शिर्के यांनी कृषी परिषदेच्या सेवा प्रवेश मंडळाला कागदपत्रे पाठविताना त्यात ‘डॉ. कांबळे यांची चौकशी चालू आहे’ असा धक्कादायक उल्लेख केला होता.

या उल्लेखामुळे आपली संचालकपदी निवड होण्याची संधी हुकणार हे स्पष्ट झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. कांबळे यांनी डॉ. शिर्के यांना लेखी पत्र देत ‘माझी कोणतीही चौकशी चालू नाही; असल्यास कागदपत्रे दाखवा,’ असे आव्हान दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे डॉ. कांबळे यांनी दोन दिवसांचे उपोषणदेखील केले. त्यामुळे या प्रकरणाचा बोभाटा झाला.

MPKV
Agriculture Department: गुणनियंत्रण निरीक्षकांच्या अधिकाराबाबत संभ्रम

डॉ. कांबळे यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी विद्यापीठाने त्यांना पदोन्नतीसाठी नाहरकत दाखला दिला. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे, डॉ. कांबळे यांनी उपोषण मागे घेताच विद्यापीठाने आधीची भूमिका बदलली व डॉ. कांबळे यांची चौकशी चालू असल्याचे पुन्हा जाहीर केले. तरीदेखील, ‘चौकशीच्या अधीन राहून पदोन्नती द्यावी,’ असा निर्णय कृषी परिषदेच्या सेवा मंडळाने दिला होता. परंतु तरीही दबावापोटी डॉ. कांबळे यांच्या पदोन्नतीचे आदेश आजतागायत विद्यापीठाने काढलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डॉ. कांबळे यांनी आपल्याला न्याय मिळावा, यासाठी पुन्हा पत्रव्यवहार केला. त्यानंतर एका ठेकेदाराच्या बंगल्यावरील वॉचमनने डॉ. कांबळे यांच्या विरोधात अर्ज दिला. त्यात डॉ. कांबळे यांनी उपोषण केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी विचित्र मागणी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे हा अर्ज मिळताच काही तासांतच डॉ. कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. कांबळे यांनी डॉ. शिर्के यांच्या बनावट कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जालीम उपाय म्हणून डॉ. कांबळे यांची चौकशी करण्यासाठी डॉ. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. विशेष म्हणजे डॉ. शिर्के यांची चौकशी करणारे डॉ. बोडकेसुद्धा या समितीचे सदस्य आहेत. दरम्यान, या दोन्ही चौकशी समित्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती कृषी परिषदेच्या सूत्रांनी दिली.

बनावट कागदपत्रांप्रकरणी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांच्याविरोधात प्रा. डॉ. दिनकर कांबळे यांनी आधी तक्रार केल्याची माहिती माझ्याकडे नाही. मात्र आता डॉ. कांबळेंची चौकशी डॉ. शिर्के यांना करता येते किंवा नाही, हा मुद्दा मी तपासून घेतो.”
राजेंद्रकुमार पाटील, कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com