Floriculture Farming : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दृष्टीने गुलाबाचे नियोजन सुरू

Flower Production : मल्हार ढोले यांचे तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमध्ये ४ एकर क्षेत्रावर पॉलिहाउस आहे. त्यांचे सध्या व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराई हंगामासाठीच्या फूल उत्पादनाचे नियोजन सुरू आहे.
Polyhouse
PolyhouseAgrowon
Published on
Updated on

Management of Rose Flower : मल्हार ढोले यांचे तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कमध्ये ४ एकर क्षेत्रावर पॉलिहाउस आहे. त्यांचे सध्या व्हॅलेंटाइन डे आणि लग्नसराई हंगामासाठीच्या फूल उत्पादनाचे नियोजन सुरू आहे.

...असे आहे त्यांचे नियोजन

एकूण शेती - ४ एकर पॉलिहाऊस

यामध्ये २ वर्षे, ५ वर्षे आणि सहा महिने अशा वयाची तीन टप्प्यांतील लागवड आहे. त्यातील २ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या रोपांवर व्हॅलेंटाइन डेच्या आणि लग्न हंगामाच्या दृष्टीने फूल उत्पादनासाठी ५ ते १७ डिसेंबर या काळात कटिंग आणि बेंडिग केली जात आहे.

या काळात पीक पोषणासाठी एकरी १ टन शेणखत आणि ५०० किलो सुपर फॉस्फेट खत दिले जाते.

कटिंग, बेंडिग दरम्यान फुलांच्या दांडीवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बुरशीनाशकाची फवारणी केली जाते. सिकेटरही दर वेळी बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवले जाते.

कटिंग झाल्यानंतर फुटवे फुटण्यासाठी आणि स्टेमच्या वाढीसाठी अन्नद्रव्ये आणि टॉनिकची फवारणी केली जाते.

या दरम्यान ठिबक सिंचनाद्वारे नियमित पाणी देतानाच विद्राव्य खतांची मात्रा २५ टक्‍क्यांनी वाढविली जाते.

Polyhouse
Floriculture : शेतकऱ्यांसाठी फुलशेती वरदान

निर्यातीसाठी २ ते ९ फेब्रुवारीपर्यंत मागणी

या वर्षी १ लाख लाल गुलाब फुले निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले असून, तेवढीच फुले देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीचे नियोजन आहे. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या काळात प्रामुख्याने लाल फुलांना २ ते ९ फेब्रुवारी दरम्‍यान सर्व निर्यातदारांकडून मागणी असते. फुलांची आखाती देशांसह युरोपियन देशांमध्ये निर्यात होते. सध्या निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत २० रुपये प्रति फूल असा दर राहत असल्याचा अनुभव ढोले यांना येत आहे.

त्यामुळे निर्यातीपेक्षा स्थानिक आणि देशांतर्गत बाजारपेठच परवडते. कारण निर्यातक्षम फुलाच्या उत्पादनासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते. तसेच त्यांची प्रतवारी आणि पॅकिंगही अधिक काळजीपूर्वक करावी लागते. त्याचा खर्च वाढतो. गेल्या काही वर्षांमध्ये स्थानिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतही लांब दांडीच्या गुलाबांना चांगला दर मिळत आहे.

Polyhouse
Flower Production Technology : फूल संशोधनाचा स्वयंचलित इंडो डच प्रकल्प कार्यान्वित

थंडीची गरज

निर्यातक्षम उत्पादनासाठी थंडीची गरज असते, यासाठी रात्रीचे तापमान १०, तर दिवसाचे तापमान २० अंश सेल्सिअसपर्यंतची गरज असते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल होत आहे. मात्र पुढील आठवड्यात चांगली थंडी पडून पोषक वातावरण निर्माण होईल, अशा अंदाज आहे.

निर्यातदारांना हवे किमान ५ रुपयांचे मार्जिन

निर्यातदारांना किमान एका फुलामागे ५ रुपयांचे मार्जिन राहिले, तर ते फायदेशीर राहते. मात्र सध्या दोन रुपये मार्जिन असल्याने निर्यात थंडावली आहे. हीच निर्यात जानेवारी अखेरपासून फेब्रुवारीच्या सहा, सात तारखेपर्यंत वाढण्याचा ढोले यांचा अंदाज आहे.

मल्हारराव ढोले, ९४२३२०४६५४

(शब्दांकन : गणेश कोरे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com