Marketing Federation : ‘पणन’ची कोट्यवधींची जमीन खासगी विद्यापीठाला देण्याचा घाट

Panan Mahamadal : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची तळेगाव दाभाडे येथील सुमारे ११० एकर जमीन एका खासगी विद्यापीठाला कवडीमोल दराने देण्याचा घाट घातला जात आहे.
Marketing Federation
Marketing FederationAgrowon
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची तळेगाव दाभाडे येथील सुमारे ११० एकर जमीन एका खासगी विद्यापीठाला कवडीमोल दराने देण्याचा घाट घातला जात आहे. यासाठी मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू असून, गेल्या तीन महिन्यांत विविध बैठका झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपूर्वी एका सहकारी संस्थेला दिलेली ही जमीन उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा पणन मंडळाकडे हस्तांतरित झाली आहे. आता पुन्हा ही जमीन एका उद्योजकाच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे.

काही वर्षांपूर्वी एका सहकारी सोसायटीला ही जमीन दिली होती. मात्र ही संस्था अवसायनात निघाल्यानंतर जमीन शासन जमा झाली. शासनाने ही जमीन कृषी संशोधन आणि कृषी संलग्न कार्यासाठी पणन मंडळाला भाडेतत्त्वावर दिली आहे.

Marketing Federation
Agriculture Fertilizers Stocks : ‘पणन’ला खतांचा अतिरिक्त कोटा द्या : अजित पवार

या जमिनीचा सुगावा संबंधित सहकारी संस्थेच्या सभासदांच्या वारसांना लागला. या वारसांनी काही स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिधींसह सहकारातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीवर हक्क दाखविण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी पणन मंडळ आणि सभासद आणि वारसांमध्ये तडजोडनामा देखील झाला होता. या तडजोडनाम्यामध्ये वारसांकडून हक्कसोडपत्र देखील करून घेतले होते.

Marketing Federation
Mango Festival : पणन मंडळाच्या आंबा महोत्सवात १५ कोटींची उलाढाल

यानंतर पुन्हा काही वारसांनी उच्च न्यायालयात दाद मागत जमीन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने यापूर्वीच निकाल देऊन हे प्रकरण निकाली काढले असल्याचे कारण देत, दावा फेटाळला. यानंतरही पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने देखील हे प्रकरण फेटाळले. काही वर्षांपूर्वी थंड झालेले प्रकरण आता पुन्हा गरम होऊ लागले आहे.

(ॲग्रो विशेष)

पुणे येथे एक खासगी विद्यापीठ गुंतवणुकीसाठी इच्छुक आहे. यासाठी हे विद्यापीठ पुण्यात सलग १०० एकर जागा शोधत होते. यासाठी नागपूर येथील एका व्हाइट कॉलर एजंटद्वारे ही जमीन विद्यापीठाला सुचविण्यात आली असून, या बाबत गेल्या तीन महिन्यांत विविध बैठका झाल्याचे समोर येत आहे. या बैठका झाल्याबाबत मंत्रालयातील सूत्रांनी दुजोरा दिला आहे.

प्रस्तावाबाबत माहिती नाही

दरम्यान, यासंदर्भात पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की संबंधित जागा कोणत्या विद्यापीठाला देण्याबाबत काही प्रस्ताव असल्याची पणन मंडळाला माहिती नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com