Rayutu Bandhu Yojana : रयतू बंधू योजनेचा निधी रोखला, निवडणूक आयोगाचे आदेश

Telangana Election : तेलंगणामध्ये निवडणुका सुरू असल्याने योजनेचा शेतकऱ्यांना वाटला जाणारा निधी तूर्त रोखला जावा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिला.
Rayutu Bandhu Yojana
Rayutu Bandhu Yojanaagrowon
Published on
Updated on

Telangana Election : तेलंगणा सरकारकडून शेतकऱ्यांना रयतू बंधू योजनेंतर्गत निधी दिला जातो. दरम्यान तेलंगणामध्ये निवडणुका सुरू असल्याने योजनेचा शेतकऱ्यांना वाटला जाणारा निधी तूर्त रोखला जावा, असे आदेश निवडणूक आयोगाने तेलंगणमधील बीआरएस सरकारला दिले आहेत.

सध्या तेलंगणामध्ये निवडणुका सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे, तोपर्यंत कोणत्याही प्रकारे योजनेचा निधी न वाटण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला. यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी हा आदेश धक्कादायक असल्याचे बोलले जाते.

रब्बी पिकांसाठी रयतू बंधू योजनेंतर्गत शेतकऱ्यांना निधीचे वाटप केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली होती. 'सोमवारी सकाळी चहा आणि नाश्ता करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात योजनेचा पैसा पोहोच होईल,' असे विधान अर्थमंत्र्यांनी केले होते.

यावर काँग्रेसने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. वास्तविक आयोगाने काही अटींवर योजनेच्या निधी वाटपाला परवानगी दिली होती. त्यात निधी वाटपाचा प्रचार केला जाऊ नये, ही अट होती. मात्र, या अटीचे बीआरएस सरकारने उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

Rayutu Bandhu Yojana
PM Kisan Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित

रयतू बंधू योजनेंतर्गत निधी वाटपाचा प्रचार करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न बीआरएसने केला असल्याचे काँग्रेसचे निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते. दरम्यान, काँग्रेसचा आरोप चुकीचा असून शेतकऱ्यांना निधीचे वाटप करण्यात हा पक्ष अडथळा आणत असल्याची प्रतिक्रिया बीआरएसने दिली आहे.

रब्बी हंगामात ७० लाख शेतकऱ्यांना रयतू बंधू योजनेंतर्गत सरकारकडून मदत दिली जाणार होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांना वर्षातून दोनदा प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com