Deewali Sanugrah Anudan : सानुग्रह अनुदानाची घोषणा हवेतच; आचारसंहितेमुळे आशेवर पाणी

Construction Workers : यंदाच्या दीपावलीमध्ये थोडीफार आर्थिक मदत मिळेल या आशेवर असलेल्या कामगारांच्या पदरी निराशा आल्याचे दिसून येत आहे.
Deewali Sanugrah Anudan
Deewali Sanugrah Anudanagrowon
Published on
Updated on

Construction Workers Kolhapur : राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात येणार होते. मात्र त्याबाबतचा कोणताही आदेश व परिपत्रक महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे काढले गेले नाही. आचारसंहितेमुळे दिवाळीपूर्वी बोनस मिळेल, याची आशा धूसर झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील १८ हजार कामगारांचा यामध्ये समावेश आहे.

याबाबत इचलकरंजी विभागाच्या सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इचलकरंजी सहायक कामगार आयुक्त कार्यालयास सानुग्रह अनुदानाबाबत कोणतेच आदेश प्राप्त झाले नाहीत. कार्यालयास आदेश प्राप्त झाल्यानंतर अनुदानाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे भोईटे यांनी सांगितलं.

इचलकरंजी सहायक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील ५५ हजारहून अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. यामधील जीवित नोंदी १८ हजार आहेत. ज्या बांधकाम कामगारांच्या नोंदी जीवित आहेत, त्यांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. त्यानंतर बांधकाम कामगार, कामगार संघटना यांनी साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला होता.

मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता घोषित केली. त्यामुळे कार्यालयीन प्रक्रियेस मर्यादा येत असल्याने बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी मिळणार नसल्याचे निश्चित झाले.

Deewali Sanugrah Anudan
Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

२०१३ मध्ये बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापन झाले. बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधी रूपये शिल्लक असून त्यामधून कामगारांना दीपावली सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी २०२१ मध्ये कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केले होते. अनेक वर्षापासून संघटनांची मागणी होती की कामगारांना सानुग्रह अनुदान मिळावे. मात्र यंदाच्या दीपावलीमध्ये थोडीफार आर्थिक मदत मिळेल या आशेवर असलेल्या कामगारांच्या पदरी निराशा आल्याचे दिसून येत आहे.

कामगार नेते भरमा कांबळे म्हणाले की, सानुग्रह अनुदानाबाबत महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने परिपत्रक काढलेले नाही. काही एजंट ५ हजार रुपयांचे आमिष दाखवून फॉर्म भरण्याच्या नावाखाली पैसे गोळा करीत कामगारांची फसवणूक करीत आहेत, त्यास बळी पडू नये असल्याचे कांबळे यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com