Market Committee : दरात खासगी बाजाराच्या तुलनेत बाजार समित्याच वरचढ

APMC Update : राज्य सरकारने खासगी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या दांगट समितीने केलेल्या तुलनात्मक अभ्यासात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच जास्त भाव मिळत असल्याचे समोर आले आहे.
Market Committee
Market Committee Agrowon

Mumbai News : राज्य सरकारने खासगी बाजार आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी नेमलेल्या दांगट समितीने केलेल्या तुलनात्मक अभ्यासात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येच जास्त भाव मिळत असल्याचे समोर आले आहे. २०२०-२१ या वर्षात २१ पैकी १३, २०२१-२२ या वर्षात २२ पैकी १७, तर २०२३ या वर्षांत ३० पैकी २४ प्रकारच्या शेतीमालास सरासरी जास्त भाव मिळाल्याचे समोर आले आहे.

मात्र त्याचवेळी शेतकरी, व्यापारी, आणि खरेदीदारांना खासगी बाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेत कमी खर्च येत असल्याचे समोर आले आहे. हमाली, तोलाईत २० ते ३० टक्के, तर अडत आणि बाजार शुल्कात ५० टक्क्यांचा फरक पडत असल्याचे समोर आले आहे.

Market Committee
International Market Committee : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजार समितीची राज्याला गरज

समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की २०२०-२१ या बाजार वर्षात कापूस, रेशीम कोष, बाजरी, ज्वारी, गहू, उडीद, हरभरा, मूग, तूर, भुईमूग, कांदा आणि हळदीला खासगी बाजाराच्या तुलनेत जास्त दर मिळाला.

यामध्ये ज्वारीला खासगी बाजारापेक्षा ६७ रुपये, हळदीला २६, बाजरीला १४, मुगाला २५ रुपये दर मिळाला आहे. तर साळ, कुळीथ, मका दाणे, लिंबू, डाळिंब, मका कणीस, टोमॅटो या शेतीमालाला खासगी बाजारात जास्त दर मिळाला आहे.

२०२१-२२ या बाजार वर्षात २२ प्रकारच्या शेतीमालांपैकी १७ प्रकाराच्या शेतीमालाला बाजार समित्यांत जास्त, तर पाच शेतीमालांना खासगी बाजारात जास्त दर मिळाला आहे. यात कापूस, बाजरी, रेशीम,ज्वारी, गहू, खपली गहू, उडीद, हरभरा, मूग, कुळीथ, मका दाणे, तीळ, सोयाबीन, लिंबू, कांदा आणि हळदीचा समावेश आहे.

तर भुईमूग, करडई डाळिंब, मका कणीस साळ या शेतीमालाला खासगी बाजारात जास्त दर मिळाला आहे. २०२२-२३ मध्ये २४ शेतीमालाला कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्त दर मिळाला आहे.

Market Committee
Market Committee : हमाली-तोलाई-वाराई कपातीवरून संघर्षाची शक्यता

खासगी बाजारात खर्च २० टक्क्यांनी कमी

बाजार समित्यांत विक्रीपूर्व आणि विक्रीपश्‍चात येणाऱ्या खर्चाची तुलना करता खासगी बाजारात कमी खर्च येतो, तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांत हमाल, तोलाई, आडत यामुळे खर्चात वाढ होते.

‘एपीएमसी’त हमाली-तोलाईचा खर्च प्रतिक्विंटल १४ ते १५ रुपये आहे, तर खासगी बाजारात तोच खर्च ९ ते १० रुपये आहे. बाजार शुल्कात ‘एपीएमसी’त प्रति शंभर रुपयांस ७५ पैसे ते १ रुपयापर्यंत निश्‍चित केला आहे.

त्यापेक्षा कमी शुल्क आकारता येत नाहीत. खासगी बाजारात असे शुल्क निश्‍चित नाही तरीही ६० पैसे ते ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी बाजार शुल्क घेतले जाते. खासगी बाजारात बाजार चालक हाच खरेदीदार असल्याने शुल्काचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. ‘एपीएमसी’त नाशिवंत शेतीमालाच्या किमतीवर कमाल सहा टक्के अडत दर आहे. तर बिगरनाशिवंत मालासाठी तीन टक्के अडत घेतली जाते.

मुंबईत मात्र हा दर १० टक्क्यांचा आहे. खासगी बाजार समित्यांमध्ये विनाअडत्या व्यवहार होत असल्याने तेथे अडत घेतली जात नाही. हमाली, तोलाई या स्वरूपाचा शेतकऱ्यास येणारा खर्च खासगी बाजारात २० ते ३० टक्क्यांनी कमी येतो. तर अडत आणि बाजार फी खासगी बाजारात ५० टक्क्यांपेक्षा कमी येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com