Monsoon Update : वाकीतील तलाव ऐन पावसाळ्यात कोरडा

Rain Issue : परिसरात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके चांगलीच तरारलेली आहेत. मात्र गावातील मोठा तलाव अद्यापही कोरडाच आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामाची काळजी लागून राहिली आहे.
Waki Lake
Waki LakeAgrowon
Published on
Updated on

Baramati News : परिसरात पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिके चांगलीच तरारलेली आहेत. मात्र गावातील मोठा तलाव अद्यापही कोरडाच आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामाची काळजी लागून राहिली आहे. दरम्यान, सोमेश्वर देवस्थानचा तलावही अजून कोरडाच आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

वाकी-कानाडवाडी गावात जवळपास ०.७५ टीएमसी क्षमतेचा मोठा तलाव असून, दोन्ही गावांतील पाणीपुरवठा योजना या तलावावरच अवलंबून आहेत. तसेच तलावाच्या लाभक्षेत्रातील विहिरींनाही या तलावात पाणी आले तरच वर्षभर पाणी टिकते. याशिवाय तलावावर उपसा सिंचन योजना असल्याने जवळपास सातशे एकर क्षेत्र आणि मत्स्य उद्योगही अवलंबून आहे. परंतु सदर तलाव अजूनही दहा-वीस टक्केदेखील भरलेला नाही.

Waki Lake
Kolhapur Rain : दुष्काळी घोषीत झालेल्या तालुक्यात भरपूर पाऊस, कोल्हापूर जिल्ह्यात यंदा ८७.१८ टक्के पावसाची नोंद

मुर्टी, मोरगाव परिसरांत पडलेल्या पावसाच्या पाण्यावर हा तलाव भरतो. या पट्ट्यात मूरपाऊस चांगला झाला आहे आणि विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. मात्र वाहून जाणाऱ्या जोरदार पावसाअभावी ओढे अजून वाहिलेच नाहीत. परिणामी तलावावर पडलेल्या पावसानेच थोडेफार खड्डे भरले आहेत. यामुळे गावाच्या पाणीपुरवठा योजनेला उन्हाळ्यात अडचण उद्भवणार आहे. तसेच ऊस पिके घेतलेल्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावेल अशी शक्यता आहे.

Waki Lake
Monsoon Rain : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

तशीच स्थिती अर्धा टीएमसी क्षमतेच्या सोमेश्वर मंदिरानजीकच्या पार्वती तलावाची आहे. चौधरवाडी व गुळुंचे पट्ट्यात पाणी वाहू लागेल असा जोरदार पाऊस न झाल्याने या तलावाला पाणी नाही. या तलावावरही करंजे गावातील अनेक विहीरी व ओढ्यावरील बंधारे अवलंबून आहेत.

तलाव भरून घेण्याची मागणी

ज्येष्ठ नेते ह. मा. जगताप व सरपंच किसन बोडरे यांनी तलावावर फार मोठी यंत्रणा अवलंबून आहे. मात्र तो भरण्यासाठी खूप जास्त पाऊस होण्याची गरज असते. त्याऐवजी नीरा नदीवरून शाश्वत योजना राबवता येऊ शकेल. सद्यःस्थितीत नाझरे जलाशयातील पाणी जोगवडी गावातील तलावापर्यंत पोहोचले आहे. जोगवडीचा तलाव भरल्यानंतर ते पाणी जोगवडी-वाकी ओढ्याद्वारे वाकी तलावाकडे नैसर्गिक पद्धतीने पोहोचते. त्याद्वारे आमचा तलाव भरून द्यावा, अशी मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com