Old Well Issue : जुन्या विहिरींचा प्रश्न चव्हाट्यावर

Agriculture Well Condition : वाकडी (ता. नेवासे) येथील वापरात नसलेल्या जुनाट विहिरीने पाच जणांचा बळी घेतल्यानंतर नगर जिल्ह्यासह राज्यातील वापरात नसलेल्या विहिरी, आड, बारवा आणि उघड्या कूपनलिका आता धास्तीचे कारण ठरू लागल्या आहेत.
Well Condition
Well ConditionAgrowon

Nagar News : वाकडी (ता. नेवासे) येथील वापरात नसलेल्या जुनाट विहिरीने पाच जणांचा बळी घेतल्यानंतर नगर जिल्ह्यासह राज्यातील वापरात नसलेल्या विहिरी, आड, बारवा आणि उघड्या कूपनलिका आता धास्तीचे कारण ठरू लागल्या आहेत. घर, शेती, गल्ली आणि सार्वजनिक ठिकाणी मृत्यूचे सापळे असल्याने सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. वाकडी येथील घटनेचा बोध प्रशासनाने कठोरपणे घेतला, तर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

Well Condition
Agriculture Well : ‘रोहयो’तून ७ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार विहिरी

गुढीपाडव्याच्या दिवशी नगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासे) येथे पाच जणांचा बळी गेला. अनेक वर्षांपासून जनावरांच्या गोठ्यातील शेण, कचरा व मलमूत्र विहिरीत जाऊन त्यात तयार झालेल्या जीवघेण्या गॅसमुळे विहिरीचे मालक असलेले माणिकराव काळे, अनिल बापूराव काळे, संदीप माणिक काळे, विशाल अनिल काळे व शेतमजूर बाबासाहेब गायकवाड यांना जीव गमवावा लागला. घटनेनंतर आता अनेक गावांत, वस्त्यांवर घराजवळ व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धोक्याच्या घंटा चर्चेत आल्या आहेत.

नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक गावांत वापरात नसलेल्या व वादात असलेल्या जुनाट विहिरी आहेत. या विहिरींचा वापर कचराकुंडी म्हणून होत आहे. जुने आड, बंद पडलेल्या कूपनलिका व बारव सुरक्षित आहेत का, याचे प्रशासनाने सर्वेक्षण करुन धोकादायक असलेले आड, विहिरी बुजविण्याचे आदेश काढण्याची गरज निर्माण झाली आहे. या बाबत संबंधित विभागास विचारणा केली असता, वापरात नसलेल्या पडक्या व धोकादायक विहिरींची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

Well Condition
Acquisition of Wells : पारोळा तालुक्यात टंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण
वाकडी येथील घटनेनंतर तालुक्यातील सर्व धोकादायक विहिरी, आड व बारवांची माहिती संकलित करून त्यावर उपाययोजना केली जाईल. पुरातन बारव जतन करताना त्याची देखभाल व तेथील सुरक्षा पाहिली जाईल.
सुधीर पाटील, प्रांताधिकारी, नेवासा, जि. नगर
आजोबा, पणजोबा काळातील व पुढे विभक्त झाल्यानंतर अनेक जुन्या विहिरी वादात आहेत. आपसात विहीर बुजविली तर बुजविलेली विहिरीची जागा कुणाच्या वाट्याला हा प्रश्न पुढे येईल म्हणून प्रशासनानेच योग्य आदेश द्यावा.
पोपटराव पवार, हिवरेबाजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com