Soybean Crop Damage : सोयाबीन नुकसानग्रस्तांच्या भरपाईचा मुद्दा विधानसभेत

Maharashtra Budget 2024 : कंधार, लोहा तालुक्यासह इतर तीन तालुक्यांतील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडत वाळून गेल्यामुळे ९३ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024Agrowon
Published on
Updated on

Nanded News : कंधार, लोहा तालुक्यासह इतर तीन तालुक्यांतील सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडत वाळून गेल्यामुळे ९३ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाने ८० कोटींच्या मदतीची मागणीही शासनाकडे केली. परंतु मदत व पुनर्वसन विभागाने मात्र या भरपाईला मंजुरी दिली नाही. याबाबत लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १२) विधानसभेत लक्षवेधी मांडली. याबाबत सरकारकडून उत्तर येणे बाकी आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील वर्षी सोयाबीनवर यलो मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मूळकुज या बुरशीजन्य रोगामुळे पिकाला बाधा झाली होती. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद विभागांनी संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील ४७८ गावांतील सोयाबीन पिकाला या रोगाची बाधा झाली.

यात कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यांतील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्राला बाधा पोहोचल्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविला. परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईबाबत राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून कार्यवाही झाली नाही.

Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 : अर्थसंकल्प पुरवणी मागणीवरून जयंत पाटलांचा टोला; अजित पवारांचा पलटवार

याबाबत लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १२) नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, यासाठी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. याबाबत सरकारकडून मात्र या लक्षवेधीला उत्तर मिळाले नाही. परंतु सोयाबीन नुकसानग्रस्तांना मुद्दा मात्र विधानसभेत पोहोचला आहे.

या लक्षवेधीमुळे कंधार, लोहा तालुक्यासह इतर तीन तालुक्यातील सोयाबीन नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget Session : महाराष्ट्र गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची केवळ शोबाजी ; विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘ॲग्रोवन’चा होता पाठपुरावा

नांदेड जिल्ह्यात सोयाबीनला येलो मोझॅक हा विषाणुजन्य रोग आणि खोडकुज व मूळकुज या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, यासाठी ‘ॲग्रोवन’मधून पाठपुरावा करण्यात आला. या विषयावर पाच ते सहा वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. यानंतर लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दखल घेत शुक्रवारी विधानसभेत मुद्दा मांडला. आमदार शिंदे यांनी शासनाकडे केलेल्या लक्षवेधीत ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा संदर्भ देण्यात आला आहे. लक्षवेधीसोबतही ॲग्रोवनमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचे कात्रण जोडण्यात आले, हे विशेष.

अतिवृष्टीच्या भरपाईतून लोहा-कंधारला वगळले

नांदेड जिल्ह्यात मागीलवर्षी जून-जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सहा लाख १७ हजार ९११ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ४२० कोटी ४६ लाख मंजूर झाले आहेत. ही भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचे इतर १४ तालुक्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच अतिवृष्टीत नुकसान होऊनही प्रशासकीय वक्रदृष्टीमुळे कंधार व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना या भरपाईपासून वंचित राहावे, लागले होते. यानंतर सोयाबीनचे बुरशीजन्य रोगामुळे नुकसान झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची आस होती, परंतु याबाबत शासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. हा विषय उशिरा का होईना, परंतु आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी लक्षवेधीमधून मांडल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com