Water Crisis : पाणीटंचाईची तीव्रता वाढली

Water Issue : चार जिल्ह्यांतील ६०७ गावांतील ३ हजार ५८६ वाड्या-वस्त्या या तहानलेल्या असून, एकूण ७१४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Pune News : पुणे, सातारा, सोलापूर आणि सांगली या चार जिल्ह्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. चार जिल्ह्यांतील ६०७ गावांतील ३ हजार ५८६ वाड्या-वस्त्या या तहानलेल्या असून, एकूण ७१४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १३ लाख ३३ हजार ७११ नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविली जात आहे.

पुणे विभागात याशिवाय ५ लाख २५ हजार पशुधनांना सुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर पुणे जिल्ह्यात सुरू असून, २२९ टँकरने १७३ गावांमधील सुमारे चार लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांत टँकर सुरू आहेत. तर साताऱ्यामध्ये १९९ टँकर, सांगली १०७ टँकर, सोलापूरमध्ये १७९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत अवघे २७ टँकर सुरू होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मोठ्या प्रमाणात टँकरची संख्या वाढली आहे.

Water Shortage
Amravati Water Issue: अमरावतीत २५ ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य; अकोला बुलढाणा, पुणेसह अहमदनगरला वळवाचा तडाखा

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात २३ टँकर सुरू असून, २७ गावांमधील १३५ वाड्या-वस्त्यांमधील ४९ हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यात २८ टँकर सुरू आहेत. १७ गावांमधील ४३ हजार ८९६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

भोर तालुक्यातील १० गावांमध्ये ७ टँकर सुरू असून ११ हजार नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दौंड तालुक्यात १० टँकरने ७ गावांतील १६ हजार ३३८ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हवेलीमध्ये १० गावांमध्ये १५ टँकर सुरू असून, ३० हजार ६४७ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Shortage
Sambhajinagar/Hingoli/Pune Water shortage : संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, हिंगोली जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

इंदापूरमध्ये १९ टँकरने २० गावांमधील ७३ हजार ४८० नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुन्नरमध्ये १८ गावांमधील १९ हजार ९३७ नागरिकांना १८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खेडमध्ये १५ गावांमधील २६ हजार २४४ नागरिकांना १२ टँकरने पाणीपुरवठा करणात येत आहे.

पुरंदरमध्ये ३८ गावांमधील १ लाख नागरिकांना ८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिरूरमध्ये ३८ गावांमध्ये १२ टँकर सुरू असून येथील २५ हजार नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर, वेल्हा तालुक्यातील ४ गावांमधील १ हजार ९३७ नागरिकांना ४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

१ लाख ६६ हजार पशुधनाची तहान टँकरवर

राज्यात गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने सुरुवातीपासूनच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आता उन्हाचा कडाका वाढत असून पाणीटंचाईची समस्या गंभीर होऊ लागली आहे. यात पुणे जिल्ह्यातील एकूण १ लाख ६६ हजार पशुधनाची तहान टँकरवर अवलंबून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com