Home Tax : घरकर वाढीमुळे खिशाला लागणार झळा

House Tax Increased : नरखेड तालुक्यातील जलालखेडा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत. जलालखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने ३० टक्के घरकर वाढवण्याचा ठराव ग्राम घेतला आहे.
Home Tax
Home TaxAgrowon

Nagpur News : नरखेड तालुक्यातील जलालखेडा ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत. जलालखेडा ग्रामपंचायत प्रशासनाने ३० टक्के घरकर वाढवण्याचा ठराव ग्राम घेतला आहे. विशेष म्हणजे ठराव घेतेवेळी सर्व सदस्य उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. घेतलेला ठराव मंजुरीसाठी शासनस्तरावर पाठवण्यात आला आहे. परिणामी ग्रामस्थांची अस्वस्थता वाढली आहे.

३० टक्के घरकर वाढ केल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घर करात वाढ होणार आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे घरकर वाढ करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे. करवाढ करायची असल्यास ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे, अशीसुद्धा मागणी गावकरी करीत आहेत.

Home Tax
Direct Tax Collection : सरकारची तिजोरी भरली;  प्रत्यक्ष कर संकलनात १८ टक्क्यांची वाढ 

करवाढ केल्यास ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ग्रामपंचायतीला सध्या घर करातून १३ लाख ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न ग्रामपंचायतला मिळत असून ३० टक्के करवाढ झाल्यास ते उत्पन्न १७ लाख ८७ हजार ५०० रुपये इतके होणार आहे.

घरकर वाढ करताना ‘रेडीरेकनर’चा दर व मागील करावर ३० टक्के करवाढ यापैकी ज्यामुळे कमी करवाढ होत असेल, त्यानुसार करवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी बाबाराव गोरे यांनी सांगितले. तसेच करवाढ केल्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल, असे सुद्धा त्यांनी सांगितले.

करवाढीचा मोठा आर्थिक भुर्दंड गावकऱ्यांवर बसणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात घरकर वाढीबाबतचा नोटीस व याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने नागरिकांना हरकत असल्यास अर्ज मागविले आहेत. यादी पाहिल्यानंतर काही नागरिकांनी करवाढीत दुजाभाव झाला असल्याचा आरोप केला आहे. करवाढ ही नियमानुसार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बाबाराव गोरे यांनी सांगितले.

Home Tax
APMC Tax : बाजारशुल्क वसुलीत नव्वद लाखांचा अपहार
दर ४ वर्षांनी घर कर वाढवण्याचा नियम असून नियमानुसार घरकर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमानुसार रेडीरेकनर दरानुसार किंवा जुन्या करावर ३० टक्के कर वाढवता येतो. रेडीरेकनर दरानुसार कर आकारणी केली तर करात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असती म्हणून जुन्या करावर ३० टक्के करवाढीचा ठराव घेण्यात आला आहे.
बाबाराव गोरे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत जलालखेडा
घरकर वाढीला सर्व सदस्यांची संमती असेल तर घरकर वाढ करण्यास माझी हरकत नाही.
कैलास निकोसे, सरपंच, ग्रामपंचायत जलालखेडा
ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचा कसलाही विचार न करता घरकर वाढवण्याचा ठराव घेतला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची परिस्थिती बिकट असून इतक्या मोठ्या प्रमाणात घरकर भरणे त्यांना कठीण होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने घर करवाढ करू नये.
-कुलदीप हिवरकर, गावकरी, जलालखेडा
होणारी करवाढ मान्य नसून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे करवाढ करू नये. कर वाढीचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात यावा. ग्रामसभा न घेता करवाढ केल्यास आंदोलन करण्यात येईल.
अतुल पेठे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com