APMC Tax : बाजारशुल्क वसुलीत नव्वद लाखांचा अपहार

APMC Scam : संशयित सुनील जाधव नावाची व्यक्ती बाजार समितीत लिपिक (प्रतवारी कार) या पदावर कार्यरत होती.
Nashk APMC
Nashk APMC Agrowon

Nashik News : बनावट पुस्तक छापून नाशिक बाजार समितीची फसवणूक करून शुल्क वसुलीतून जवळपास नव्वद लाखांचा अपहार केल्याप्रकरणी बाजार समितीच्या बडतर्फ कर्मचाऱ्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित सुनील जाधव नावाची व्यक्ती बाजार समितीत लिपिक (प्रतवारी कार) या पदावर कार्यरत होती. १ डिसेंबर ते २४ मे २०२२ पर्यंत जाधव याची जकात नाका मार्केट शुल्क वसुलीकरिता नेमणूक करण्यात आली होती. या बाजार शुल्क वसुलीच्या काही रकमेचा भरणा त्याने बाजार समितीत केला.

पावती पुस्तक जाधव यास दिले होते. मात्र, जाधव याने बाजार शुल्क वसुलीसाठी दिलेल्या या पावती पुस्तकाचा वापर केला नाही. परंतु संबंधित क्रमांकांचे बनावट पावती पुस्तक बनवून बाजार शुल्क वसुली केली. बाजार समितीने दिलेले पावती पुस्तक कार्यालयात जमा करीत पावत्याच फाडल्या नाहीत, असे सांगितले.

Nashk APMC
APMC Levy : ‘लेव्ही’वरून लिलाव न झाल्यामुळे ९० कोटींची उलाढाल ठप्प

तसेच पावती पुस्तक क्रमांक ३०९ त्यास दिले नसताना त्या माध्यमातून बाजार शुल्काची वसुली केली. बाजार समितीच्या एकूण १२ पावती पुस्तकांचा गैरवापर करून पावती पुस्तकांमध्ये खाडाखोड करून बाजार समितीच्या दप्तरात फेरफार करून त्याद्वारे एकूण रक्कम ८९ लाख ७७ हजार दोनशे रुपयांचा अपहार केला.

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच बाजार समित्यांच्या सेवेतून जाधव यास बडतर्फ करण्यात आले. बाजार समितीने यावर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. सुमारे ८९ लाख आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम निश्चित केली. त्यानंतर संशयितास रक्कम भरण्यासंबंधी नोटीस पाठविली.

Nashk APMC
Pune APMC : पुणे बाजार समितीला हवा विमानतळाचा कनेक्ट

मात्र, जाधव याने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. जवळपास दोन ते तीन महिने हे प्रकरण औद्योगिक न्यायालयात चालले. तेथील निकाल हा संशयिताविरुद्ध लागला. या विरोधात जाधव याने उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने ही बाब फौजदारी असल्याचे नमूद केले. संशयिताने या प्रकरणी औद्योगिक न्यायालयात यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानुसार औद्योगिक न्यायालयाचा निकाल बाजार समितीच्या बाजूने कायम राहिल्याने जाधव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रारीवरून फसवणुकीचा व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com