Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Government Scheme : पंचायत समिती सभागृहात आवास योजना अंतर्गत सुरू नसलेले घरकुल लाभार्थीसाठी विस्तार अधिकारी, ग्रामीण अभियंते व ग्रामसेवक यांच्या समवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
Gharkul Scheme
Gharkul Scheme Agrowon

Pune News : तालुक्यात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या १ हजार ३०४ घरकुलांची कामे सुरू करण्यात आलेली नाहीत ही बाब गंभीर असून सदर घरकुल कामे लाभार्थी बांधवांनी आपल्या घरातील महिलांच्या सन्मानासाठी लवकर सुरू करून पूर्ण करावीत अन्यथा शासन अनुदान परत करावे लागेल, असा इशारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी दिला.

पंचायत समिती सभागृहात आवास योजना अंतर्गत सुरू नसलेले घरकुल लाभार्थीसाठी विस्तार अधिकारी, ग्रामीण अभियंते व ग्रामसेवक यांच्या समवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी शालिनी कडू बोलत होत्या. या वेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, विस्तार अधिकारी संजीव मारकड उपस्थित होते.

Gharkul Scheme
Gharkul Scheme : साताऱ्यातील ५८ हजार सामान्यांच्या घराचे स्वप्न कागदावरचं...!

या वेळी कडू म्हणाल्या, ‘‘शासनामार्फत प्रधानमंत्री, रमाई, शबरी, मोदी आवास, जिल्हा परिषद निधीचे यशवंत व दिव्यांग घरकुलचा लाभ बेघर किंवा कच्चे घर असलेल्या लाभार्थींना लाभ दिला जात आहे. मात्र तालुक्यातील १ हजार ३०४ घरकुलांची कामे अद्याप सुरू झाली नाहीत. याबाबत अनेकवेळा नोटीसा देऊनही बांधकामे पूर्ण होत नाहीत, ही गोष्ट नवीन उद्दिष्टासाठी अडचणीची ठरत आहे. यामुळे सुरू नसलेली घरकुल योजना पूर्ण करावी.’’

Gharkul Scheme
Gharkul Scheme : परभणीत १३ हजार ४६२ घरकुलांना मंजुरी

गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले, ‘‘एकूण २ हजार १५४ अपूर्ण घरकुले असून, त्यापैकी १ हजार ३०४ घरकुल सुरू नसल्याने जिल्ह्यात इंदापूर तालुक्याची प्रगती समाधानकारक नाही. यापुढे प्रत्येक खातेप्रमुखांना व विस्तार अधिकारी यांना किमान २ गावे दत्तक देऊन अपूर्ण घरकुल पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.’’

मतदान जागृतीसाठी शपथ...

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वेळी मतदान जनजागृती गावागावांत करण्यात यावी यासाठी ग्रामसेवक, महिला भगिनी व बचत गटाच्या सीआरपी यांना प्रकल्प संचालक शालिनी कडू व गट विकास अधिकारी सचिन खुडे यांच्याकडून शपथ देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com