Amrit Yojana : ऐतिहासिक पाझर तलावाला ‘अमृत’ मिळणार

Government News : ऐतिहासिक महत्त्व आसलेल्या बाराव्या शतकातील पाझर तलावाच्या सुशोभीकरणासाठी अमृत योजना दोन मधून वीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Amrit Yojana
Amrit YojanaAgrowon

Ardhapur News : ऐतिहासिक महत्त्व आसलेल्या बाराव्या शतकातील पाझर तलावाच्या सुशोभीकरणासाठी अमृत योजना दोन मधून वीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ पुढील आठवड्यात गुरुवारी (ता.३१) होणार आहे.

या कामामुळे अर्धापूर शहराच्या वैभवात भर पडणार असून शहरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. विशेष म्हणजे रणरागिणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी या कामाचा शुभारंभ होत असल्याने एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Amrit Yojana
Water Shortage : ‘आठ दिवसांत तलाव भरून द्या, अन्यथा उपोषण करू’

या कामाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. या तलावाची पाहणी काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे शहराध्यक्ष राजू शेटे यांनी केली.

अर्धापूर शहराला ऐतिहासिक महत्त्व असून शहरात असलेल्या शिलालेखात पाझर तलावाच्या संबंधित माहिती उपलब्ध आहे. तसेच हेमाडपंथी शिवमंदिर, केशवराज मंदिर, शिलालेख आदी ऐतिहासिक वारसा शहराला लाभला आहे.

शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी तलावाची निर्मिती करण्यात आली होती. जुन्या शहरातील प्रत्येक घरी पाण्यासाठी आड खोदण्यात आले होते.

आजही काही घरांत आड आहेत. पाझर तलावाने भूगर्भातील पाण्याची पातळी वर राहण्यासाठी मदत होत असल्याने प्रत्येक घरी व सार्वजनिक ठिकाणी आड, विहीरी खोदण्यात आल्या होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com