Sitaphal Rate Update : सीताफळाला उच्चांकी प्रति किलो ३६० रुपये दर

Sitaphal Season : सीताफळ काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवार (ता. २८) पासून सीताफळाची आवक सुरू झाली आहे.
Sitaphal Rate
Sitaphal RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : सीताफळ काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. पुण्यातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवार (ता. २८) पासून सीताफळाची आवक सुरू झाली आहे.

पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये वडकी (ता. हवेली) येथील शशिकांत पांडुरंग फाटे यांनी विक्रीसाठी आणलेल्या सीताफळाला प्रति किलो ३६० रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

गुलटेकडी मार्केटमध्ये सीताफळाची पुणे परिसरातील पुरंदर, वडकी या भागांतून मोठ्या प्रमाणात आवक होते. या भागांत शेकडो हेक्टरवर सीताफळाच्या फळबागा आहेत. यंदा वडकी येथील श्री. फाटे यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले होते.

त्यानुसार पहिली तोडणी शनिवारी (ता. २७) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे मार्केटमध्ये फळ व्यापारी युवराज काची यांच्याकडे विक्रीसाठी आणला होता. मार्केटमध्ये सीताफळाची प्रतवारी करून दोन कॅरेट आणले होते. एका कॅरेटमध्ये एक नंबरचा १५ किलो, तर दुसऱ्या कॅरेटमध्ये दोन नंबरचा ९ किलो असा एकूण २४ किलो माल विक्रीसाठी आणला होता.

Sitaphal Rate
Sitaphal Bahar : सीताफळ बागेत उन्हाळी बहराचे व्यवस्थापन कसे करावे?

मार्केटमध्ये एक नंबरच्या मालाला प्रति किलो ३६० रुपयांचा दर मिळाला. तर दोन नंबरच्या मालाला प्रति किलो १०० रुपयांचा दर मिळाला आहे. येत्या काळात मार्केटमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.

याविषयी श्री. फाटे म्हणाले, की पहिल्या तोडणीत २४ किलोचा माल निघाला असून, दुसरा तोडा गुरुवारी केला जाणार आहे. गेल्या वर्षीही असेच नियोजन केले होते. त्या वेळी एक जून रोजी १५-१६ किलो सीताफळांची मार्केटमध्ये विक्री केली होती. त्यालाही प्रति किलो १८० रुपये दर मिळाला होता.

तर २०२१ मध्येही प्रति किलो १८० रुपये, तर २०२० मध्येही प्रति किलो १५० रुपये दर मिळाला होता. मात्र चालू वर्षी पहिल्यांदाच हा सर्वाधिक दर मिळाला आहे. त्यामुळे सीताफळाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी चांगलेच प्रोत्साहन मिळाले आहे.

मार्केटमध्ये आलेल्या फळाची वैशिष्ट्ये :

- एक नंबर सीताफळांचे २०० ते ४०० ग्रॅम वजन.

- दोन नंबर सीताफळांचे ५० ते १५० ग्रॅम वजन.

- विषमुक्त असल्याने खाण्यासाठी चवीला चांगली.

- गराचे प्रमाण चांगले, टिकवण क्षमता अधिक, मागणी चांगली

Sitaphal Rate
Sitaphal Sangh : पुरंदर तालुका सीताफळ संघाची कार्यकारिणी जाहीर
माझ्याकडे सीताफळाचे अडीच एकरावर ७०० झाडे आहेत. ही सर्व झाडे पुरंदर गावरान वाणाची आहेत. मी स्वतः अकरा वर्षांपासून उत्पादन घेत आहे. दरवर्षी नियोजन करत असतो. आतापर्यंत मी घेतलेल्या उत्पादनाला उच्चांकी असा दर मिळाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये माझ्या मालाची चांगलीच चर्चा झाली.
शशिकांत फाटे, सीताफळ उत्पादक शेतकरी, वडकी, हवेली
यंदा हंगामातील पहिल्यांदाच रविवारपासून सीताफळाची आवक झाली आहे. सुरुवातीला आवक कमी असते. त्यामुळे मार्केटमध्ये आलेल्या सीताफळाला प्रति किलोला सर्वाधिक दर मिळाला आहे. ही गावरान जातीची सीताफळे असल्याने मार्केटमध्ये या फळाला चांगली मागणी आहे. येत्या काळात चांगली आवक होईल. त्यामुळे दरात काहीशी घट होईल.
युवराज काची, फळव्यापारी, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com