
Palghar News : डिसेंबरमधील थंडीच्या वातावरणामुळे बाजारात अंडी, मांसाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर विविध व्यापारी राज्याच्या बाहेरून कोंबड्या आणि इतर पक्षी विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सध्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी विक्रेते दाखल झाले आहेत. या विदेशी पक्ष्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
गिनी फाऊल हा पक्षी आफ्रिकन गिनी बेटावर आढळतो. तो कमी खर्चात पाळला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देतो. हा पक्षी वर्षभरात सुमारे ९० ते १०० अंडी घालतो.
या अंड्यांची किंमत प्रति नग १७ ते २० रुपये असते. त्याच्या अंड्यांची टिकवण क्षमता अधिक असल्याने आणि ती सहज फुटत नसल्याने ग्राहक त्यांना प्राधान्य देतात. या पक्ष्यांचा आहार आणि देखभाल कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये त्याचा स्वीकार वाढत आहे. स्थानिक लोक त्याला तितारी, चित्रा गिनी असेही संबोधतात.
४०० रुपयांपर्यंत किंमत
उत्तर प्रदेशातून आलेले विक्रेते महामार्गावर गिनी फाऊल पक्षी विक्री करत आहेत. त्यांच्या आकारमानानुसार २०० ते ४०० रुपये प्रति पक्षी दर आहे. रामानंद यादव या विक्रेत्याने सांगितले की, थंडीच्या काळात मांस व अंड्याला अधिक मागणी असल्याने त्यांनी ८०० ते एक हजार गिनी फाऊल पक्षी विक्रीसाठी आणले आहेत.
पालनाची फायद्याची बाजू
या पक्ष्याच्या मांसात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तुलनेने जास्त असून त्यात अनेक जीवनसत्त्वे आढळतात. शेतकरी पारंपरिक कोंबडीपालनाला पर्याय म्हणून गिनी फाऊल पालनाकडे वळत आहेत. कमी खर्चात चांगली गुंतवणूक असल्याने हा पक्षी चांगला पर्याय मानला जात आहे.
निसर्गासाठी उपयुक्त पक्षी
शेतातील कीड नियंत्रणासाठी हा पक्षी उपयुक्त असून अंडी, मांस उत्पादनासाठी पाळला जातो. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान त्यांचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी हा हंगामी व्यवसाय ठरतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.