sandeep Shirguppe
शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी कमी खर्चातील चांगले उत्पन्न म्हणून कोंबडी पालन करतात.
कुक्कूट पालनमध्ये राहण्याची जागा, खाण्याची व्यवस्था, पाणी व्यवस्थापन, रोगांपासून संरक्षण करणे गरजेचे असते.
ब्रॉयलर पिलांसाठी पुरेशे शेड असावे. त्यासोबत दोन्ही बाजूंनी पडदे किंवा ताडपत्रीचा आडोसा करावा.
शेडमधील तापमान उष्ण ठेवण्यासाठी विजेचा बल्ब, शेगडी किंवा ब्रुडरचा वापर करू शकतात.
वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यास पर्यायी व्यवस्था केलेली असावी. पक्ष्यांना पिण्यासाठी कोमट पाणी दिल्यास अतिउत्तमच.
पिलांना पालनासाठी आणण्याअगोदर २४ तासआधी शेडचे पडदे दोन्ही बाजूंनी झाकून घ्यावेत.
जमीन थंड पडते. त्यामुळे शेडमध्ये तीन ते चार इंच इतका गादीचा थर म्हणजेच तांदळाचा भुसा किंवा धान्याचे तूस वापरावे.
पिले आणल्यानंतर ऊब मिळण्यासाठी त्यांना १ ते २० दिवसांपर्यंत कृत्रीम ऊर्जा देणे आवश्यक आहे.