Crop Issue : पावसाने पिकांची वाढ रोखली

Rain Crop Damage : तेल्हारा तालुक्यात मागील दोन महिन्यांत सतत पाऊस होत असल्याने पिकांची यंदा वाढ थांबलेली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Akola News : तेल्हारा तालुक्यात मागील दोन महिन्यांत सतत पाऊस होत असल्याने पिकांची यंदा वाढ थांबलेली आहे. अनेक ठिकाणी सखल भागातील शेतांमध्ये पावसाचे पाणी साचलेले राहिल्याने पिके कुजण्याचेही प्रकार घडलेले आहेत.

तेल्हारा तालुक्यात यावर्षी काही भागात जून महिन्यात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केली होती. मात्र, पेरणीपासून पाऊस सातत्याने आल्याने शेतातील पिकांची वाढ जेमतेम एक फुटापर्यंत झाले. अतिपावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यात ५४ हजार हेक्टर खरीप क्षेत्र आहे. त्यात बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा उपलब्ध असल्याने कपाशीची लागवड केली होती.

Crop Damage
Crop Damage : काढणीला आलेल्या मुगाचे पावसाने नुकसान

नंतर १५ जूनपासून तालुक्यात काही गावांमध्ये पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी लगेच पेरणी सुरू केली. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग, पिकाची पेरणी केली. तेव्हापासून म्हणजेच जून ते आतापर्यंत सातत्याने पाऊस झालेला आहे. झाडांवर फुलपात्या, बोंडांची धारणा झाली नाही. सोयाबीन पिकातही शेंगा लागण्याचे प्रमाण नगण्य आहे. काही भागात सोयाबीन पिवळे पडले आहे. काहींनी सोयाबीनमध्ये चार वेळा किटकनाशक फवारणी करुनही फळधारणा झालेली नाही. तालुक्यात ५० टक्के शेती पावसामुळे अतितण झाल्याने पडीक पडलेली आहे.

Crop Damage
Paddy Crop Quality Issue : किडीमुळे भातपिकाचा दर्जा खालावण्याची भीती
मी २० एकर शेती लागवणीने केली आहे. या शेतात पीक उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. परंतु तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतातील पिकांची परिस्थिती गंभीर बनलेली आहे. शेतीसाठी लावलेला पैसा निघणे कठीण दिसते आहे. शासनाने दुसऱ्या प्रकारची योजना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत व पिकाला भाव दिल्यास शेतकरी जगेल.
सागर नराजे, हिंगणी, ता. तेल्हारा, जि. अकोला
तेल्हारा, अकोट तालुक्यांत या वर्षी सततच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. काही गावांमधील शेती पडीक झाली आहे. सोयाबीन पिवळे पडले आहे. कपाशीची वाढ झाली नाही. शासनाने शेती पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे.
अनिल गावंडे, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती, अकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com