Grape Patent : शेतकऱ्यांना बिगर पेटंटेड द्राक्ष वाण देण्याचे उद्दिष्ट

Kailas Bhosale : राज्यातील द्राक्ष उत्पादक व शासनातील दुवा म्हणून द्राक्ष संघ काम करेल. आमचे पहिले उद्दिष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत बिगर पेटंटेड वाण पोहोचविण्याचे राहील.
Kailas Bhosale
Kailas BhosaleAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील द्राक्ष उत्पादक व शासनातील दुवा म्हणून द्राक्ष संघ काम करेल. आमचे पहिले उद्दिष्ट सामान्य शेतकऱ्यांपर्यंत बिगर पेटंटेड वाण पोहोचविण्याचे राहील, असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या तीनदिवसीय द्राक्ष परिषदेच्या समाप्ती सोमवारी (ता.२६) पुण्यात झाली. त्यानंतर झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी संघाची नवी कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

शेतकऱ्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. अध्यक्षपदी कैलास भोसले, उपाध्यक्षपदी मारुती चव्हाण; तर खजिनदारपदी शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली. संघाच्या मध्यवर्ती विज्ञान समितीचे अध्यक्षपद यंदा अभिषेक कांचन यांना देण्यात आले आहे.

Kailas Bhosale
Turmeric Research Patents : एकाच दिवशी मिळाले १३ आंतरराष्ट्रीय पेटंट

श्री. भोसले म्हणाले, ‘‘राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी संघ अहोरात्र काम करतो. संघाच्या आतापर्यंतच्या कामाच्या वाटचालीत मला शेतकऱ्यांनी साथ दिली व राज्यातील यापूर्वीच्या माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. त्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणजे ३० ऑगस्टला द्राक्ष शेतीबाबत राज्य शासन बैठक घेत आहे.’’

Kailas Bhosale
Grape Farming : बदलत्या हवामानानुसार द्राक्ष शेतीची करण्याची आवश्यकता : डॉ. सावंत

अखिल भारतीय फलोत्पादन संघाचे अध्यक्ष सोपान कांचन म्हणाले, ‘‘गेली ६२ वर्षे संघ काम करतो आहे. त्यामुळेच प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेतृत्वदेखील सतत संघाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहात आलेले आहेत. संघाला कधीही गालबोट लागलेले नाही. यापुढेही चुकीचे काम संघ करणार नाही. आम्ही सारे अनुभवी मंडळी संघासाठी नव्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्यास यापुढेही तत्पर राहू.’’

संघाचे माजी पदाधिकारी बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले, की नाशिक जिल्ह्याकडे संघाचे अध्यक्षपद आल्याचा आनंद शेतकऱ्यांना आहे. द्राक्ष उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी संघ काम करतो. शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता वाढलेल्या आहे. तांत्रिक शेतीत नव्या पिढीला हवे ते मिळवून देण्याचे मोठे आव्हान नव्या पदाधिकाऱ्यांसमोर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com