Pune News : सध्याच्या स्थितीत वातावरणातील होणाऱ्या बदलाला सामोरे जाण्यासाठी द्राक्ष बागायतदारांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून बदलत्या हवामानाला अनुरूप द्राक्ष शेती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांनी केले.
इंदापूर येथील डॉ. नीतू मांडके सभागृहात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र इंदापूर व कृषी विभाग आत्माअंतर्गत शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद तसेच द्राक्ष फळ छाटणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सावंत यांनी मार्गदर्शन केले
डॉ. सावंत म्हणाले, की अवेळी पडणारा पाऊस तापमानातील चढ-उतार यावर मात करण्यासाठी संरक्षित द्राक्ष शेती करून उच्च प्रतीचे उर्वरित अंश विरहित द्राक्ष उत्पादन घेण्याचे आवाहन केले.
द्राक्ष संशोधन केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ डॉ. अजय उपाध्याय यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाबरोबरच चुनखडीयुक्त जमिनीमधील खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे वेगवेगळे उपाय सांगितले.
तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांनी संरक्षित द्राक्ष शेतीसाठी शासनाच्या योजनेविषयी तसेच उत्पादन खर्चातील बचती विषयी मार्गदर्शन केले. महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी २०४७ पर्यंत विकसित भारतासाठी शेती क्षेत्रामध्ये करावयाच्या बदलाविषयी मार्गदर्शन केले.
द्राक्ष संशोधन केंद्राचे रोग शास्त्रज्ञ डॉ. सुजय सहा यांनी द्राक्ष बागेतील रोग नियंत्रणाच्या रणनीतीबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. कीटकशास्त्रज्ञ डॉ. दीपेंद्र यादव यांनी द्राक्षावरील उडद्या, पिठ्या ढेकूण व विनेगार माशी नियंत्रणाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.
चर्चासत्रास बारामती, इंदापूर, माळशिरस, माढा भागातील द्राक्ष बागायतदार उपस्थित होते. प्रास्ताविक सुधीर वाघमोडे यांनी केले आभार आत्मा चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय बोडके यांनी मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.