Team Agrowon
१५ मार्चपासून पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात फक्त ५ तासचं मुखदर्शन घेता येणार. त्यानंतर मुखदर्शन बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलीय.
ते पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.१२) बोलत होते. विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यासाठी दीड महीने कालावधी लागेल. तो पहाटे ५ ते ११ च्या दरम्यानचं श्री क्षेत्र पंढरपुर येथील विठ्ठलांचं मुखदर्शन घेता येणार आहे.
त्यामुळे पुढील ४५ दिवस भाविकांना विठुरायाचं पदस्पर्श करून दर्शन घेता येणार नाही.
चैत्री यात्रेसाठी भाविक पंढरपुरात येत असतात.
त्यावेळी मात्र पूर्ण वेळ मुखदर्शन घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. १५ मार्चपासून मंदिरातील काम करण्यात येणार आहे.