Radhanagari Dam : राधानगरीचे चार दरवाजे उघडले

Kolhapur Rain Update : पश्‍चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने राधानगरीसह अन्य धरणांतूनही पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये होत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होत आहे.
Radhanagari Dam
Radhanagari DamAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने राधानगरीसह अन्य धरणांतूनही पाण्याचा विसर्ग नद्यांमध्ये होत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होत आहे. रविवारी (ता. २५) दुपारपर्यंत राधानगरी धरणांचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले होते.

यातून ७२१२ क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरू झाला. या बरोबरच काळम्मावाडी धरणातून १००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कुंभी धरणांतून ६५० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत १६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी (ता. २३) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ५८ मिमी झाला.

Radhanagari Dam
Kolhapur Rain News : पाऊस वाढल्याने पुन्हा धडकी

राजाराम बंधाऱ्यावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली. राधानगरी धरण क्षेत्रावर गेल्या २४ तासांत ५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काळम्मावाडी धरण क्षेत्रावर ६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्रालगत वाहत आहे. पाऊस भात, नागली, भुईमूग, ऊस, सोयाबीन पिकांसाठी पोषक झाला आहे. पावसामुळे घरांची पडझड सुरूच आहे.

Radhanagari Dam
Kolhapur Rain Yellow Alert : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट, ढगफुटीसदृश पावसाने शेती पिकांचे नुकसान

गेली पंधरा दिवस तालुक्यात ऊन पडले होते. कुठेतरी पाऊस कोसळत होता. पावसाअभावी माळरानावरील भात, नागली व सोयाबीन पीक करपत चालली होती. गत चोवीस तासांत तालुक्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने पीक वाढीला चांगली मदत झाली आहे. पिकावरील पडलेले रोग दूर होणार आहेत.

चंदगडमध्ये माळरानावरील भात खाचरातील पाणी आटले होते. मात्र या पावसाने पुन्हा शेतात पाणी साचले. ओढे, नाले तसेच घटप्रभा व ताम्रपर्णी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. चंदगड, कानूर, जांबरे, उमगाव, हेरे, पाटणे, नागनवाडी, अडकूर परिसरात पाऊस सुरू होता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com