

Satara News : कास, जि. सातारा : वर्ल्ड हेरिटेज दर्जा असलेल्या कास पठारावरील फुलोत्सव मावळतीकडे झुकला आहे. त्यामुळे www. kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्वीकारले जाणारे बुकिंग आजपासून बंद करण्यात आले, तर यापुढे तिकीट दरही कमी करण्याचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या सभेत घेण्यात आला. यावर्षीचा कास पठारावरील फुलोत्सवाचा हंगाम पाच सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला.
हंगामासाठी प्रतिव्यक्ती १५० रुपये शुल्क आकारले जात होते; परंतु पठारावरील फुलांचे प्रमाण कमी झाल्याने बुधवारपासून (ता. १६) कास पठारावर ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. फुलांचा बहर कमी झाल्याने प्रवेश शुल्कही केवळ ५० रुपये असणार आहे. कास पठार परिसरात प्रवेश करायचा असेल, तर त्यांना गेटवर तिकीट काढून थेट प्रवेश मिळणार आहे. पठारावरील काही भागात अजूनही फुले पाहावयास मिळत आहेत. त्यामध्येमिकी माऊस आणि सोनकीचे प्रमाण जास्त आहे, तर राजमार्गावर असलेल्या कुमुदिनी तलावामध्येही कुमुदिनीची फुले मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
कुमुदिनी तलावातील फुले अजून पंधरा दिवस तरी राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पठार अजूनही हिरवेगार आहे. गवताचे प्रमाण मात्र वाढले आहे. या गवतामुळे फुले दिसेनाशी झाली आहेत. यावर्षी फुलांचे प्रमाणही चांगले राहिल्याने पर्यटकांची संख्याही मोठी होती.
कास समितीच्या वतीने हंगाम यशस्वी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले असले, तरी वाहतूक कोंडीची समस्या यावर्षी सातत्याने जाणवत होती. त्याकडे वन विभाग आणि कास समितीने पर्यायी मार्गाचा विचार करून आतापासूनच नियोजन केल्यास आगामी हंगाम तरी पर्यटकांसाठी सुखकर ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.