Kas Pathar : कासला आहे तरी काय खास ? जाणून घ्या

Team Agrowon

फुलांचे गलिच्छा

पावसाळ्यात फुलांचे गलिच्छा आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा पाहण्‍यासाठी पर्यटकांची पाऊले कास पठाराच्या दिशेने वळू लागली आहेत.

Kas Pathar | Agrowon

नयनरम्य ठिकाण

साताऱ्यापासून २५ किमी अंतरावर कास पठार हे डोळ्याचे पारणे फेडणारे ठिकाण आहे. कोयना वन्यजीव अभयारण्याला लागून कास पठार आहे.

Kas Pathar | Agrowon

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

या पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आकर्षक फुले येतात. याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असेही म्हणतात.

Kas Pathar | Agrowon

फुलांच्या आठशेहून अधिक प्रजाती

इथे फुलांच्या आठशेहून अधिक प्रजाती आढळतात. हे पठार तब्बल एक हजार हेक्टर क्षेत्रात पसरले आहे.

जागतिक वारसा स्थळ

या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता लक्षात घेता, UNESCO ने २०१२ मध्ये याला जागतिक नैसर्गिक वारसा असलेलं स्थळ म्हणून घोषित केलं आहे.

सुंदर तलाव

इथं एक अतिशय सुंदर तलाव देखील आहे.या पठारावर आणि कास सरोवरात अशी अनेक झाडे आहेत, ती इतरत्र कुठेही आढळत नाहीत.

Kas Pathar | Agrowon

हंगामास अवधी

हंगामास अवधी असतानाही पर्यटक पठारावरील कुमुदिनी तलाव, कास दर्शन गॅलरी, नैसर्गिक दगडी कमान पाहण्‍यास जात आहेत.

Kas Pathar | Agrowon
water level | Agrowon