GST Collection : मे महिन्यातील जीएसटी संकलनात मोठी वाढ! वार्षिक १० टक्के वाढ

Goods and Services Tax : मे २०२४ मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) महसूलात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत व्यवहारातील मजबूत वाढ झाली असून आयातीतील घट झाली आहे.
GST Collection
GST CollectionAgrowon

Pune News : मे महिन्यातील देशातील सकल जीएसटी संकलनाचे आकडे समोर आले असून संकलनात वाढ झाली आहे. मे महिन्यातील जीएसटी संकलन वाढून ती १.७३ लाख कोटी रूपये झाले आहे. देशांतर्गत सकल GST महसूल मेमध्ये १५.३ टक्क्यांनी वाढल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने शनिवारी (ता. १) दिली. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात सकल वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात १० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातील जीएसटी संकलन १.७३ लाख कोटींवर गेला असून गेल्या वर्षी संकलन १.५७ लाख कोटी रूपये होते.

एप्रिल २०२४ मध्ये हेच संकलन २.१० लाख कोटी रूपये झाले होते. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात देखील जीएसटी संकलनात १२.४ टक्क्यांची वाढ झाली होती. तर मार्च २०२४ मध्ये देखील जीएसटी संकलन १.७८ लाख कोटी रुपये झाले होते.

GST Collection
GST Collection : यंदा १.७८ लाख कोटींचे जीएसटी कलेक्शन; ११.५ टक्क्यांची वाढ

निव्वळ जीएसटीत चांगली वाढ

वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आयातीत घट झाल्याने समोर आले आहे. यामुळेच देशांतर्गत व्यवहारातील महसुलात जोरदार वाढ झाली. जी १५.३ टक्के आहे. तर आयातीत ४.३ टक्के घट झाली आहे. मे महिन्यात निव्वळ जीएसटीचा विचार केल्यास मे महिन्यातील महसूल हा १.४४ लाख कोटींवर पोहचला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ६.९ टक्क्यांनी अधिक आहे. तर यातील परताव्याचा समावेश केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील मे महिन्यापर्यंत ३.३६ लाख कोटी रुपये आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.६ टक्के वाढ आहे.

वित्त मंत्रालयाच्या एकूण आकडेवारीनुसार, १,७२,७३९ कोटी रुपयांच्या एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटीचा वाटा ३२,४०९ कोटी आहे. तर राज्यांच्या जीएसटीचा वाटा ४०,२६५ कोटी. एकात्मिक जीएसटी ८७,७८१ कोटी रुपये होते. यात आयात शुल्काचे ३९,८७९ कोटी आणि उपकर संकलनाच्या १२,२८४ रूपयांमध्ये आयात केलेल्या वस्तूंवर जमा झालेला १,०७६ कोटींच्या महसूली कराचा समावेश आहे

GST Collection
Direct Tax Collection : सरकारची तिजोरी भरली;  प्रत्यक्ष कर संकलनात १८ टक्क्यांची वाढ 

मे २०२४ मध्ये केंद्र सरकारने ६७,२०४ कोटी रूपयांच्या निव्वळ आयजीएसटी मधून सीजीएसटी ३८,५१९ कोटी रूपये आणि एसजीएसटीचे ३२,७३३ कोटी रूपये देण्यात आले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर, मे, २०२४ मध्ये एकूण महसूल सीजीएसटीत ७०, ९२८ रूपये आणि एसजीएसटीसाठी ७२,९९९ कोटी रूपये झाला आहे.

तसेच २०२४-२५ या आर्थिक वर्षात मे 2024 पर्यंत केंद्र सरकारकडून १,५४,६७१ कोटींच्या निव्वळ आयजीएसटी संकलनातून सीजीएसटीला ८८,८२७ कोटी रूपये आणि एसजीएसटीला ७४,३३३ कोटी रूपये जमा करण्यात आले होते. या सेटलमेंटनंतर, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी मे २०२४ पर्यंत एकूण महसूल सीजीएसटीसाठी १,६५,०८१ कोटी रूपये आणि एसजीएसटीसाठी १,६८, १३७ कोटी रूपये मिळाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com