GST Collection : यंदा १.७८ लाख कोटींचे जीएसटी कलेक्शन; ११.५ टक्क्यांची वाढ

Goods And Services Tax : गेल्या आर्थिक वर्षातील (२०२३-२४) जीएसटीचे कलेक्शन चांगले झाले असून यात ११.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मार्च अखेरीस देशात १.७८ लाख कोटी रूपये जीएसटीचे संकलन झाले आहे.
GST
GSTAgrowon

Pune News : देशांतर्गत व्यवसाय आणि व्यवहारांमधील देवाण-घेवाण वाढीचा परिणाम जीएसटीवर (वस्तू आणि सेवा कर) झाला असून ११.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे यंदा १.७८ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. तर आतापर्यंत दुसऱ्यांदा सर्वाधिक संकलनाची नोंद झाली आहे. जीएसटीच्या स्वरूपात सरकारची कमाई देखील वाढली असून ती २०.१८ लाख कोटी रुपये झाली आहे. ही माहिती वित्त मंत्रालयाने सोमवारी (ता. ०१) जारी केलेल्या आकडेवारीवरून उघड झालेली आहे. 

वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रूपये झाले होते. जे २०२२-२३ मधील संकलनापेक्षा १.५० लाख कोटींनी अधिक होते. शिवाय मार्च २०२४ पर्यंत रिफंड केल्यानंतर निव्वळ जीएसटी १८.०१ लाख कोटी आहे. विशेषत: गेल्या वर्षी याच कालावधीतील जीएसटीच्या संकलना पेक्षा १३.४ टक्कांनी अधिक आहे.

GST
Agriculture GST : जाच ‘जीएसटी’चा!

दरम्यान यंदा जीएसटी संकलनात सातत्य राहीले असून  २०२३-२४ मध्ये २०.१८ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. यावरून अर्थ तज्ज्ञांच्या मते, मासिक संकलनात दुहेरी अंकी वाढ अर्थव्यवस्थेची लवचिकता दर्शवते.

एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात २०.१४ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. जे २०२३ -२४ च्या तुलनेत ११.७ टक्क्यांनी वाढले आहे. तर २०२३ -२४ मध्ये जीएसटी मासिक सकल १.६८ लाख कोटी होते. तर निव्वळ संकलन हे १.५ लाख कोटी झाले होते. तर वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार मार्च २०२४ साठी जीएसटी १.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर एकूण जीएसटी संकलनात ही वाढ देशांतर्गत व्यवहारांमधून झाल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. 

सर्वाधिक जीएसटी संकलन

एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे. यंदा १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलनाची नोंद झाली आहे. तर मार्च २०२४ साठी परताव्याचे जीएसटी संकलन हे १.६५ लाख कोटी रुपये होते. पण यंदा यात चांगली वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संकलन हे १८.४ टक्के जास्त आहे.

GST
Agriculture GST : शेतीशी निगडित असलेल्या वस्तू जीएसटी मुक्त कराव्यात

निर्गुंतवणुकीचे गणित चुकले

सरकारचे निर्गुंतवणुकीचे गणित चुकले असून केंद्राने भागभांडवल विकून यंदा केवळ १६,५०७ कोटी रूपयेच उभारले आहेत. जे सरकारच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहे. तर १० सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेस (CPSE) मध्ये ऑफर फॉर सेल (OFS) च्या निर्गुंतवणुकीकरणातून ५१ हजार कोटी रुपये उभारण्याचा अंदाज सरकाने व्यक्त केला होता. मात्र हा अंदाज चुकला असून यंदा फक्त १६,५०७.२९ कोटी रूपयेच ऑफर फॉर सेल आणि शेअर विक्रीद्वारे मिळाले आहेत. 

मार्च २०२४ मधील संकलनाचा तपशील

-केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): ₹३४,५३२ कोटी

-राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): ₹४३,७४६ कोटी

-एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): ₹८७,९४७ कोटी (आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या ₹४०,३२२ कोटींसह)

-उपकर: ₹१२,२५९ कोटी (यामध्ये आयात केलेल्या वस्तूंवर जमा झालेल्या ₹९९६ कोटींचा समावेश आहे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com