Farm Maintenance : शेतकरीच बनला राखणदार

रसायनी परिसरात खरिपाच्या हंगामातील भातकापणीनंतर सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्यांचे पीक घेत आहेत.
Farm maintenance
Farm maintenanceAgrowon

Rice Farming : रसायनी परिसरात खरिपाच्या हंगामातील (Kharif Season) भातकापणीनंतर सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्यांचे पीक (vegetable crop) घेत आहेत. दोन-तीन वर्षांपासून या दुबार पिकाला हवामान बदलाचा फटका बसू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत.

त्यात आता गावातील आणि रानातील डुकरे; तसेच मोकाट जनावरांचाही पिकाला धोका वाढला आहे. शेतकऱ्यांना पिकाच्या संरक्षणासाठी शेतावर राखण करत बसावे लागत आहे.

परिसरातील वासांबे मोहोपाडा, आपटे, गुळसुंदे, चावणे, वडगाव पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेत आहे. कापणीनंतर दुबार कडधान्याचे पीक घेतात.

याशिवाय सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याच्या पिकाची लागवड करतात.

चार-पाच वर्षांपासून वादळ, अतिवृष्टी, परतीचा आणि अवकाळी पाऊस; तसेच वळवाच्या पावसाचा फटका बसत असल्याने खरीप आणि रब्बीच्या हंगामात पिकाचे नुकसान होत आहे. परिणामी, शेतकरी पुरतेच हतबल झाले असून आर्थिक संकटात सापडले आहेत.

Farm maintenance
Vegetable Crop damage : टोमॅटो, वांगी उत्पादकांना फटका

दरम्यान, परिसरात दाट लोकवस्ती असलेल्या गावातील डुकरे दुबार भात आणि भाजीपाला पिकांचे नुकसान करत आहे. डोंगरालगत असलेल्या शेतातही रानातील डुकरे, गुरे घुसून लोळत असतात. ही गुरे-जनावरे पीक खाऊन पायाखाली तुडवत असतात.

यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना दिवस रात्र शेतावर राखण करत बसावे लागत आहे.

खराब हवामानाचा फटका बसत असल्याने अगोदर नुकसान होत आहे. त्यात रोग पडला, तर उपाययोजना करताना उत्पादन खर्च वाढत आहे. भाजीपाल्याचा मळा लावला आहे. गुरे शेतात घुसून पिकाचे नुकसान करत असल्याने राखण करत आहे.
जगदीश म्हसकर, शेतकरी, जांभिवली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com