

Chhatrapati Sambhajinagar News : ‘केव्हीके’चे सर्व युनिट अत्यंत छान आहेत. तसेच केव्हीकेचे विस्तार कार्य देखील चांगले असून, हे भविष्यात आणखी प्रभावीपणे राबवावे. याचा फायदा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असा सल्ला भारतीय कृषी संशोधन परिषद- कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (अटारी) पुणेचे संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी दिला.
नुकतीच डॉ. रॉय यांनी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे भेट दिली. या वेळी त्यांच्या सोबत अटारी पुणे येथील कृषी विस्तारचे शास्त्रज्ञ डॉ. तुषार आथरे, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. राजेश टी. यांचीही उपस्थिती होती.
या वेळी डॉ. रॉय यांनी कृषी विज्ञान केंद्रात सुरू असणाऱ्या जैविक खते निर्मिती युनिट, जैविक बुरशीनाशक निर्मिती युनिट, मृदा व जल परीक्षण प्रयोगशाळा, धन्वंतरी उद्यान, कुक्कुटपालन युनिट, प्रस्तावित स्वच्छता व प्रतवारी युनिट, कृषी यांत्रिकी युनिट, स्वयंचलित हवामान केंद्र, उच्च तंत्रज्ञान रोपवाटिका, शेततळे, गांडूळ खत निर्मिती युनिट तसेच केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या मोसंबी, जांभूळ, चिंच, लिंबू, आंबा, केळी इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सर्व युनिटबद्दलची माहिती घेतली.
भविष्यातील सुधारणा करिता महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. रॉय यांनी केव्हीकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती घेतली. भविष्यात विविध कार्य करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे, औरंगाबाद-१ चे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी, कृषी विज्ञान केंद्राचे,औरंगाबाद-१ चे विषय विशेषज्ञ प्रा. गीता यादव, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर, प्रा. अशोक निर्वळ तसेच कार्यक्रम सहायक विवेक पतंगे, प्रक्षेत्र व्यवस्थापक श्रीमती करुणा शिंदे, सहायक अधीक्षक श्रीमती पोर्णिमा माने, हवामान निरीक्षक शिवा काजळे, कविता मानकर, किशोर शेरे, कैलास सुदेवाड, जयदेव सिंगल, जयदीप बनसोडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.