Water Pollution : जलप्रदूषणामुळे ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात

Impact on Animal And Birds : नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील प्रमुख तालुक्यांना गोदावरीच्या जलप्रदूषणामुळे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. साहजिकच, माणसांबरोबरच पशु-पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होऊ लागला.
Water Pollution
Water Pollution Agrowon

Nashik News : गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहर आणि औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, पाणवेलींच्या विळख्यामुळे गोदावरी नदी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. जागतिक दर्जाचे रामसर क्षेत्र असलेल्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांच्या अधिवासावर यामुळे परिणाम होणार असल्याने आता नाशिकच्या ‘रामसर’चे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील प्रमुख तालुक्यांना गोदावरीच्या जलप्रदूषणामुळे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. साहजिकच, माणसांबरोबरच पशु-पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होऊ लागला.

नाशिक आणि अहमदनगर, मराठवाड्याची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरीत मोठ्या प्रमाणात पसरलेल्या पानवेलींनी श्वास कोंडला जात आहे. माडसांगवी ते नांदुर मध्यमेश्वर धरणापर्यंत जवळपास ३० ते ४० किलोमीटरवर गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी पाणवेली पसरल्या आहेत. दरम्यान, या प्रकाराकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. रामसर क्षेत्र असलेल्या नांदुर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ठिकठिकाणी शेकडो प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळल्याचे चित्र असताना याची साधी दखल घेतली जात नाही. अनेक ठिकाणी पाणवेली कुजल्या आहेत. पाण्याने रंग बदलला असून, दुर्गंधीही सुटली आहे.

Water Pollution
Dam Water Stock : ‘मांजरा’त केवळ एक टक्काच जिवंत पाणीसाठा शिल्लक

निफाड तहसीलपासून हाकेच्या अंतरावर गोदावरी नदीचे बॅकवॉटर कादवा नदीत येऊन तेथे देखील जलपर्णी वाढल्या आहेत. थेट अधिकाऱ्यांच्या दाराजवळच जलपर्णीने विळखा घातला असताना याचे प्रशासनाला सोयरसुतक नाही. निफाड येथील जागतिक दर्जाच्या पाणथळ क्षेत्रामध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना, मृत मासे आणि प्रदूषणामुळे पक्षी तसेच माणसांवर होणारा परिणाम याकडे कोणाचेच लक्ष नाही.

वाढत्या जलप्रदूषणामुळे गोदावरी आणि उपनद्यांमध्ये पाणवेलींची निर्मिती झाल्याने नांदुर मधमेश्वर ते माडसांगवीपर्यंत पाणवेलींचा विळखा गोदामाईला बसला आहे. या पाणवेलींमुळे विशेषतः पावसाळ्यात गोदावरी आणि उपनद्यांना येणाऱ्या पुरामुळे पाणवेली गोदावरीतील सायखेडा, करंजगाव येथील पुलांना अडकून निफाडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊन त्याचा ताण प्रशासनावर पडतो. नांदुर मध्यमेश्वरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पाच गेटची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्याचा कुठलाही परिणाम न होता आजही पूरपरिस्थितीत पूर्ण गोदाघाट सापडत असल्याचे चित्र आहे.

Water Pollution
Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?
गोदाकाठवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागातील लोक एकत्र येऊन जनआंदोलन उभे करण्यात येईल.
दत्ता आरोटे, जिल्हाप्रमुख, प्रहार विद्यार्थी संघटना, नाशिक
गोदावरीत पाणवेलींचे आच्छादन निर्माण झाले आहे. जनावरे चारा समजून जातात अन् पाणवेलींमध्ये गुंतून त्यांच्या जीवावर बेतते. प्रदूषित पाण्यामुळे जलचर मृत होत आहेत.
प्रतीक रायते, शिंगवे
गोदावरीपात्रात दूषित पाण्यामुळे पाणवेली वाढतात. पाण्याचे प्रदूषण रोखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आता न्यायालयात गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी दाद मागून लढा उभारू.
अॅड. विजय मोगल, पर्यावरण अभ्यासक, कोठुरे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com