Agriculture GST : शेतीशी निगडित असलेल्या वस्तू जीएसटी मुक्त कराव्यात

MLA Atul Benke : सर्वच पक्षांच्या आमदारांना शेतकरी, शेतीविषयी कळवळा आहे. मागील अधिवेशनात सुद्धा ही मागणी मी केली होती.
GST
GSTAgrowon

Pune News : शेतीचा वाढलेला भांडवली खर्च कमी करण्यासाठी खते, बियाणे, कीटकनाशके, अवजारे व शेतीशी निगडित असलेल्या सर्व वस्तू जीएसटी मुक्त कराव्यात, अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहात केली.

आमदार बेनके म्हणाले की, सर्वच पक्षांच्या आमदारांना शेतकरी, शेतीविषयी कळवळा आहे. मागील अधिवेशनात सुद्धा ही मागणी मी केली होती. शेतकरी वर्ग अनेक अडचणींचा सामना करत आहे.

शेतीसाठी आवश्यक असणारी रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशके, अवजारे व इतर वस्तूची खरेदी करताना शेतकऱ्यांना जीएसटी द्यावा लागतो. यामुळे भांडवली खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर जीएसटीचा परतावा मिळण्याची व्यवस्था नाही.

GST
GST Council Meeting : सणासुदीच्या तोंडावर जीएसटी कौन्सिलने वाढवला गोडवा ; गुळासह या वस्तूंवरील घटला कर

शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंवरील जीएसटी माफ करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी जीएसटी विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार बेनके यांनी केली. आमदार बेनके यांनी केलेल्या या मागणीचे जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

GST
GST On Molasses : ‘जीएसटी’ कमी केल्याचे स्वागत, पण...

जुन्नर- शिरूरला जोडणारा रस्ता मंजूर

जुन्नर ते विघ्नहर सहकारी साखर कारखानामार्गे पिंपरखेड दरम्यानच्या ३८ किलोमीटर लांबीच्या जुन्नर व शिरूर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून ३५० कोटी रुपयांचा निधी अर्थमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात मंजूर झाला आहे.

जुन्नर व शिरूर तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यामुळे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना- येडगाव-चौदा नंबर- नगदवाडी-भोरवाडी- सुलतानपूर-शिरोली-निमगाव सावा -औरंगपूर- पारगाव तर्फे आळे पिंपरखेड या भागातील शेतकऱ्यांची सोय होय होणार आहे. या रस्त्याच्या मागणीचा प्रस्ताव २७ ऑगस्ट २०२१ रोजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी माझ्याकडे दिला होता, असेही बेनके म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com