E-Peek Pahani : तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणी २६ ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार

E-Crop Survey Update : राज्यातील खरीप-२०२४ हंगामासाठी तलाठ्यांच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी २६ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
E-Peek Pahani
E-Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील खरीप-२०२४ हंगामासाठी तलाठ्यांच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी २६ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. खरिपासाठी यंदा शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टला सुरू झाली होती. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत होती. मात्र, राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता आली नाही.

त्यामुळे याच्या नोंदी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या होत्या. त्याची दखल घेत जमाबंदी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांनी शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीसाठी एक आठवड्याची मुदतवाढ दिली. ‘‘राज्यात शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीकपाहणी २३ सप्टेंबरला समाप्त झाली आहे. आता तलाठ्यांच्या स्तरावरील पीकपाहणीची कामे जलदरित्या सुरू आहेत,’’ असे महसूल विभागातून सांगण्यात आले.

E-Peek Pahani
E-Peek Pahani News: ई-पीकपाहणीची अट रद्द करा

खरिपासाठी यंदा दोन प्रकारची ई-पीकपाहणी केली जात आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित सुरू असलेल्या ई-पीकपाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) अजून २३ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. ही पाहणी २८०० गावांपुरती मर्यादित आहे. राज्यातील इतर ४१ हजारांहून अधिक गावांमध्ये राज्य शासनाची ई-पीकपाहणी (नॉन डीसीएस) तलाठ्यांच्या पातळीवर २७ ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. शेतकरी व तलाठ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १.२० कोटी हेक्टरची ई-पीकपाहणी पूर्ण झालेली आहे.

E-Peek Pahani
E-Peek Pahani : नगर जिल्ह्यात ई-पीकपाहणीत पारनेर तालुका अव्वल

कृषी विभागाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत वाटपासाठी ई-पीकपाहणीची अट टाकली. त्यामुळे यंदा ई-पीकपाहणीचा मुद्दा राज्यभर चर्चेला आला. मात्र, ई-पीकपाहणीत समस्या येत असल्याने ही अट काढून टाकण्याची मागणीदेखील काही भागातून झाली. ई-पीकपाहणीतील समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने सर्व्हरची क्षमता यंदा वाढवली, असा दावा सूत्रांनी केला आहे.

अशी आहे ई-पीकपाहणीची ताजी स्थिती...

शेतकऱ्यांची खाते संख्या : २२६,६७,९३२

भ्रमणध्वनीद्वारे झालेली पीकपाहणी : ७९,२३,९५५

तलाठ्यांनी केलेली पीकपाहणी : ५,६०,३३०

भ्रमणध्वनी व तलाठ्यांनी केलेल्या पीकपाहणीचे एकूण क्षेत्र : १,२०,५१,२२३ हेक्टर

दुरुस्तीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना

महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की भ्रमणध्वनी अथवा कोणत्याही प्रकारे झालेल्या ई-पीकपाहणीची नोंद दुरुस्त करून घेण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी आधी तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल. तसेच, तलाठ्यांच्या स्तरावर झालेल्या नोंदीमधील दुरुस्तीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्याला आहेत. मात्र, दुरुस्तीपूर्वी या अधिकाऱ्याने गावाला भेट देत पंचनामा करणे आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com