E-Peek Pahani : नगर जिल्ह्यात ई-पीकपाहणीत पारनेर तालुका अव्वल

Government Scheme : ई-पीक पाहणीचे एकूण आतापर्यंत एकूण काम ६६.९२ टक्के पीकपाहणी पूर्ण झाली असून, ३३ टक्के क्षेत्रावरील पीकपाहणी तलाठ्यामार्फत होणार आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Nagar News: जिल्ह्यात ई-पीकपाहणी पारनेर तालुका अव्वल आहे. आतापर्यंत या तालुक्यात सुमारे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, जिल्ह्याचे ई-पीक पाहणीचे एकूण आतापर्यंत एकूण काम ६६.९२ टक्के पीकपाहणी पूर्ण झाली असून, ३३ टक्के क्षेत्रावरील पीकपाहणी तलाठ्यामार्फत होणार आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ई-पीकपाहणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीसाठी १ ऑगस्टपासून २३ सप्टेंबरपर्यंत अशी ४५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.

जिल्ह्यातील ४ लाख ९९ हजार ४७४.२४ हेक्टर शेतकऱ्यांनी काम पूर्ण केले. राज्य शासनाच्या सात-बारा उताऱ्यावरील हस्तलिखित नोंदी बंद झाल्या आहेत. मोबाईल ॲपद्वारे ई-पीकपाहणी केल्यानंतरच ऑनलाइन पिकांची नोंदणी केली जाते.

E Peek Pahani
E Peek Pahani : तेहतीस हजार शेतकऱ्यांचा ई-पीकपाहणीत सहभाग

पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे काम करणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ६७ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम तलाठ्यामार्फत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत तालुक्यात २८ हजार ५७३, नेवासे तालुक्यात ५६ हजार ०८३, शेवगाव तालुक्यात ४६ हजार ००६, कर्जत तालुक्यात ३७ हजार ३२२, श्रीगोंदे तालुक्यात २९ हजार ४३२, पारनेर तालुक्यात ४३ हजार ४१६, श्रीरामपूर तालुक्यात २६ हजार ७४०, पाथर्डी तालुक्यात ३६ हजार ९२४, जामखेड तालुक्यात ३० हजार ४०४, संगमनेर तालुक्यात ३९ हजार ९१२, अकोले तालुक्यात २९ हजार ५९१, राहुरी तालुक्यात २९ हजार ७७४, राहाता तालुक्यात ३० हजार २३८, कोपरगाव तालुक्यात ३५ हजार ०५२ हेक्टरवर ई-पीकपाहणी पूर्ण झाली आहे.

ई-पीकपाहणीची टक्केवारी

नगर ः ७१.४१,

नेवासे ः ५८.३४,

श्रीगोंदे ः ७३.१३,

पारनेर ः ८३.४१,

पाथर्डी ः ७५.४०,

शेवगाव ः ५१.९६,

कर्जत ः ७१.७७,

जामखेड ः ५८.५८,

संगमनेर ः ७६.९२,

अकोले ः ६६.२७,

श्रीरामपूर ः ५९.६८,

राहुरी ः ६३.४४,

राहाता ः ५९.८६,

कोपरगाव ः ८१.१९,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com