Mahad Ganpati : महड तीर्थक्षेत्राचा विकास कागदावरच

Ashtvinayak : २३ कोटींचा आराखडा तयार
Mahad Ganpati
Mahad GanpatiAgrowon
Published on
Updated on

Khalapur News : खालापूर : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड देवस्थान परिसराचा विकास कागदावरच अडकला आहे. लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेले अष्टविनायकापैकी दोन तीर्थक्षेत्र रायगडमध्ये आहेत. यापैकी एक सुधागड पाली येथे असून दुसरे खालापूर तालुक्यात महड येथे आहे. महडच्या विकासासाठी मध्यंतरी २३ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता; मात्र राज्‍यातील सत्तांतरानंतर विकासाला खीळ बसली. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून हाकेच्या अंतरावर असलेल्या महड वरदविनायक मंदिर बाराही महिने भक्तांनी गजबजलेले असते.

वीकेण्ड, संकष्ट चतुर्थी, अंगारकीला भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होतो. त्‍यामुळे स्‍थानिकांनाही चांगला रोजगार मिळतो; परंतु तीर्थक्षेत्र परिसरात आवश्यक सोयी-सुविधा नसल्‍याने भाविकांची गैरसोय होते. देवस्थान समितीकडून भक्तनिवास, भोजनालय आणि स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली असली तरी रस्‍त्‍याची डागडुजी, सुशोभीकरण, पथदिवे आदी कामे प्रलंबित आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गापासून मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्‍त्‍याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. अनेक पथदिवे बंद असल्‍याने रात्रीच्या वेळी भाविकांसह स्‍थानिकांची गैरसोय होते. शिवाय, वाहनतळ नसल्‍याने अनेकदा खासगी वाहने रस्‍त्‍यालगत अथवा जागा मिळेल तिथे उभी केली जात असल्‍याने वाहतूक कोंडी होते.

Mahad Ganpati
Mahad LandSlide : दरडीच्या कटू आठवणींचा मनात कल्लोळ

मंदिरालगत असलेल्‍या भूमिगत सांडपाणी वाहिनीची जीर्ण झाली असून तिला गळती लागल्‍याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्‍यामुळे याठिकाणी नवीन सांडपाणी वाहिनी टाकण्याची आवश्यक आहे. महडमध्ये अतिक्रमणांचे पेव वाढत असून त्‍यावर कारवाई करण्यास प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. चार वर्षांपूर्वी आदिती तटकरे यांनी महडसाठी २३ कोटी पेक्षा जास्त निधीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार महड येथे उद्यान, मुख्य रस्त्याला हॅलोजनची आवश्यक आहे. रस्ते रुंदीकरणाबरोबरच अतिक्रमणामुळे मंदिर परिसराचा श्वास कोंडला आहे.

गरजेचे वेळी अग्निशमन बंब आत येणेही कठीण आहे. महड फाटा येथे बसथांबा नसल्याने भाविकांची प्रचंड गैरसोय होते. स्थानिक नगर पंचायत प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष होत असून लवकरात लवकर विकास होणे गरजेचा आहे. - गीता पाटील, सामाजिक कार्यकर्ती, महड केला होता. मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या सत्ता बदलामुळे तीर्थक्षेत्र विकास आराखडा गुंडाळण्यात आला आहे. गुरुचरण जागेवर अतिक्रमण! महड येथे शेकडो एकर गुरूचरण जागा उपलब्ध आहे. मात्र त्‍यापैकी बहुतांश जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. तर काहींचा उपयोग डम्‍पिंग ग्राउंड, मुंगूर तलावासाठी केला जातो. याठिकाणी उद्याने अथवा स्‍वच्छतागृह, निवाराशेड उभारल्‍यास भाविकांना सुविधा उपलब्‍ध होतील, अशी मागणी स्‍थानिकांकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com