Gram Panchayat Elections : कोणत्या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता; पहा निवडणुक निकालाची लाईव्ह अपडेट

Gram Panchayat Elections Result 2023 : राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायत निवडणुकींचा आज निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Gram Panchayat Election Result Live : राज्यभरातील २ हजार ३६९ ग्रामपंचायत निवडणुकींसाठी काल मतदान झाले. या निवडणुकीत २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका झाली. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सर्वच मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Gram Panchayat Elections
Swabhimani Uus Parishad: 'स्वाभिमानी'ची ऊस परिषद उद्या; कारखानदारांसह शेतकऱ्यांना राजू शेट्टींच्या निर्णयाची प्रतिक्षा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर सर्व पक्ष निवडणुकींकडे लक्ष लागून राहिला आहे. परंतु नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका निवडणुका रखडल्या आहेत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.

राज्यभरातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी १८५ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामध्ये पार पडल्या आहेत. २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले. सरासरी ७४ टक्के मतदान झाले

नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सुरुवातीच्या सहा निकालामध्ये खणगाव, लिंगा आणि घरतवाडा, सबकुंड येथे भाजपने बाजी मारली आहे. तर खुटंबा आणि घरतवाडा येथे अपक्षांची सत्ता आली आहे.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून ३ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने सत्ता मिळवली. तर दोन जागांवर स्थानिक आघाडींना यश मिळले आहे. बारामती तालुक्यातील सर्व २६ ग्रामपंचायतींपैकी २४ ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाकडे आल्या. तर २ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहेत.

बीडमधील परळी तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीपैकी २ ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सत्ता मिळवली. तर पंकजा मुंडे यांच्या गटाला फक्त १ ग्रामपंचायतीत यश आले. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील ३४ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने बाजी मारली. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. धुळे जिल्ह्यातील ३१ पैकी २५ ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com