Sugarcane Season : ...अन्यथा उसाच्या फडाला आग लावून आत्मदहन करू

Sugarcane Harvesting : कार्यक्षेत्रातील उसाची तातडीने तोडणी करा अन्यथा फडाला आग लाऊन आत्मदहन करण्याची परवानगी द्या, असा इशारा निवेदनाद्वारे श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिला आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Nanded News : तोडणीची तारीख येऊनही ऊस जात नसल्याने हडसणी (ता. हदगाव) येथील श्री सुभाष शुगर्स प्रा. लि. या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस वाळत आहे. यामुळे व्यथित झालेल्या ऊस उत्पादकांनी सेवानिवृत्त साखर सहसंचालकांसमवेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

कार्यक्षेत्रातील उसाची तातडीने तोडणी करा अन्यथा फडाला आग लाऊन आत्मदहन करण्याची परवानगी द्या, असा इशारा निवेदनाद्वारे श्रीकांत देशमुख यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिला आहे.

हडसणी (ता. हदगाव) येथील श्री सुभाष शुगर्स प्रा.लि. या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गाळपाअभावी अद्याप हजारो हेक्टरवरील ऊस उभा आहे. तोडणीची तारीख येऊनही ऊस जात नसल्याने कारखाना प्रशासन प्रतिसाद देत नाही. यामुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे.

ऊसतोड कामगार अडवणूक करून प्रतिएकर तीन हजार रुपये तर वाहन चालक एका फेरीला पाचशे रुपयांची मागणी करीत आहेत. हार्वेस्टर लावले तर दोन हजार रुपये पूजेला ठेवावे लागत आहेत, याकडे कारखाना प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Sugarcane Season
Maharashtra Sugarcane Season : यदांच्या ऊस गळीत हंगामाची काय आहे स्थिती, साखरेचे उत्पादन घटले की वाढले

जिवाचा आटापिटा करूनही वेळेवर ऊस जात नाही. परिणामी उसाच्या वजनात ५० टक्क्यांपर्यंत घट येत आहे. यामुळे एकरी २५ ते ३० हजार रुपये लागवडीसाठी केलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे उसाच्या भरवशावर राहिलेल्या शेतकऱ्यांसमोर मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, खत-बियाण्यांची देणी कशी भागवावी, असा प्रश्‍न आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : देशात आतापर्यंत २२३ लाख टन साखर उत्पादन ; २६ कारखान्यांचे गाळप बंद

ऊस मागील कित्येक महिन्यापासून पाणी तोडल्यामुळे वाळण्याच्या मार्गावर आहे. तोडीबाबत कर्मचारी व कामगारांना ऊस दाखवला असता तो वजनात भरणार नाही, या कारणाने तोडणारे येत नाहीत, असे कारखाना प्रशासन सांगत आहे. परंतु या परिस्थितीला कारखाना जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

...असे असेल आंदोलन

- शेतात वाळत चाललेल्या उभ्या उसाला आग लावणे

- उसाला आग लावून उभ्या उसात आत्मदहन करणे

- आपत्तीग्रस्त शेतकरी कारखान्यावर मार्चा काढून आमरण उपोषणाला बसणे

ऊस उत्पादक प्रतिनिधी म्हणून उर्वरित ऊसतोडीबाबत बनचिंचोली येथे सहा मार्च रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. आंदोलनाबाबत निवेदन देत आहोत. या आंदोलनातून चुकीचे काही घडल्यास त्याला ऊस उत्पादक जबाबदार राहणार नाहीत.
- श्रीकांत देशमुख, सेवानिवृत्त प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com