Water Scarcity : पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद

Water Crisis : मॉन्सून वेळेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, मॉन्सून वेळेत दाखल न झाल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Nashik News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. मे अखेर टँकरची संख्याही ४०० वर पोहोचली आहे. मॉन्सून वेळेत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, मॉन्सून वेळेत दाखल न झाल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर आतापर्यंत तब्बल ६३ कोटींचा खर्च झाला आहे. शासनाकडून टंचाईसाठी निधी प्राप्त झालेला नाही.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेकडो गावे व वस्त्यांमधील सात लाखांवरील म्हणजे २० टक्के नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी सरकारने आतापर्यंत ६३ कोटी रुपये खर्च केले आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : टॅंकरमुक्तीसाठी ‘जलसमृद्ध गाव अभियान’

या विभागांच्या पाणीयोजनांचे जलस्रोत कोरडे पडल्यामुळे तेथेही टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७० टक्के पाऊस झाला असल्याने पर्जन्यछायेच्या तालुक्यांमध्ये अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या ३५ लाख असून,त्यापैकी सात लाखांवर म्हणजे २० टक्के लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी विहीर अधिग्रहण व टँकर वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे.

गेल्या जुलैपासून आतापर्यंत या टँकर व विहीर अधिग्रहणासाठी ६३ कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यातील केवळ आठ लाखांची देयके टँकरचालकांना देण्यात आली असून, ५५ कोटींची देयके प्रलंबित आहेत

Water Scarcity
Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

या देयकांसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी गेल्या आठ-दहा वर्षांपासून दोनच पुरवठादार असून, ते पुरवठादार जिल्ह्याच्या पूर्व भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करतात.यावर्षी पश्चिम भागातील अधिक पाऊस होत असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण या तालुक्यांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

आतापर्यंत तब्बल २०४ विहिरींचे अधिग्रहण

ग्रामीण भागातही दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात ३६० गावे आणि ९३७ वाड्या अशा एकूण एक हजार २९७ गाव-वाड्यांना ३९० टँकरच्या ८७१ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

यात १४ शासकीय आणि ३७६ खासगी टँकरचा समावेश आहे. या टँकरद्वारे सहा लाख ७६ हजार ९५४ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल २०४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात गावांसाठी ६३, तर टँकरसाठी १३५ विहिरींचा समावेश आहे.

तालुकानिहाय सुरू असलेले टँकर

बागलाण (४२), चांदवड (३३), देवळा (३१), इगतपुरी (१६), मालेगाव (४९), नांदगाव (७७), नाशिक (१), पेठ (१६), सुरगाणा.

तालुकानिहाय टँकरद्वारे

पाणी पुरवण्याचा खर्च

तालुका खर्च

नाशिक १०.८० लाख

चांदवड ४.१० कोटी

नांदगाव ३२.१९ कोटी

बागलाण ३.२८ कोटी

देवळा १३.८८ कोटी

मालेगाव ४.४८ कोटी

येवला ४.५३ कोटी

सिन्नर १.३० कोटी

एकूण ६२.८९ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com